esakal | Parbhani: शहरी भागातील ४७३ शाळांचे दरवाजे उघडणार
sakal

बोलून बातमी शोधा

परभणी : शहरी भागातील ४७३ शाळांचे दरवाजे उघडणार

परभणी : शहरी भागातील ४७३ शाळांचे दरवाजे उघडणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

परभणी : शासनाने सोमवारपासून (ता. चार ऑक्टोबर) शहरी भागात आठवी ते बारावी तर ग्रामीण भागात सुरु झालेल्या शाळांबरोबर पाचवी ते सातवीचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर शहरी भागातील ४७३ शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांचे दरवाजे विद्यार्थ्यांसाठी उघडणार आहेत तर ग्रामीण भागातील शाळांमध्ये ६१ हजार ११२ विद्यार्थ्यांची भर पडणार आहे.

जिल्ह्यात शासकीय, अनुदानीत, विनाअनुदानीत व जिल्हा परिषदेच्या एकूण शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या दोन हजार १०६ असून इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतची विद्यार्थी संख्या चार लाख १२ हजार ९१ आहे. शासनाने अद्यापही ग्रामीण भागात पहिली ते चौथी व शहरी भागात पहिली ते सातवीच्या शाळा सुरु केल्या नाहीत. त्यामुळे जवळपास निम्म्या विद्यार्थ्यांसाठी शाळेचे दरवाजे अद्यापही बंदच आहेत. तर दोन लाख १५ हजार १५ विद्यार्थ्यांची इच्छा असेल तर शाळेत जाऊन अध्ययन करण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

हेही वाचा: बीड : काळ्या बाजारात जाणाऱ्या रेशन धान्याचा टेम्पो नागरिकांनीच पकडला

ग्रामीण भागात तेराशेवर शाळा सुरु

शासनाने ग्रामीण भागात ता. १५ जुलै पासूनच इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरु केले आहेत. तर ता. चार ऑक्टोबरपासून पाचवी ते सातवीचे वर्ग सुरु करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील सुरु होणाऱ्या शाळांची संख्या आता एक हजार ३२७ झाली असून या शाळांमध्ये एकूण एक लाख ३७ हजार ९४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी ७५ हजार ९८२ विद्यार्थ्यांच्या शाळा सुरु झालेल्या असून ६१ हजार ११२ विद्यार्थ्यांच्या सोमवारपासून (ता. चार) सुरु होणार आहेत.

शहरी भागातील ४७३ शाळा सुरु

शहरी भागात पहिली ते बारावीपर्यंतच्या ५८३ शाळा, कनिष्ठ महाविद्यालये असून एकूण विद्यार्थी संख्या एक लाख ८९ हजार ३४३ आहेत. शासनाच्या निर्णयानुसार फक्त इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सोमवारपासून सुरु होणार आहेत. अशा ४७३ शाळा असून त्यातील ७७ हजार ९२१ विद्यार्थ्यांना थेट शाळेत जाऊन अध्ययन व अध्यापनात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

वर्ग शहरी विद्यार्थी संख्या ग्रामीण विद्यार्थी संख्या

पाचवी --- २१७५४

सहावी --- २०१२४

सातवी --- १९२३४

आठवी १७१९२ १८०९५

नववी १८२९५ १६५७०

दहावी १७९२२ १७००३

अकरावी १३३१६ १२३२२

बारावी १११४६ ११९९२

एकूण ७७९२१ १३७०९४

loading image
go to top