Parbhani : सुवर्णभूमीतून बौद्धभूमीत बुद्ध पुन्हा अवतरले

जागतिक बौद्ध धम्मगुरू भंते लाँगफुजी यांचे प्रतिपादन
MLA Santosh Bangar
MLA Santosh Bangar sakal

परभणी : भगवान बुद्धांनी जगाला शांतीचा संदेश दिला आहे. जगाची सुवर्णभूमीतून परत एकदा तथागत गौतम बुध्द हे या बौद्ध धम्म पदयात्रेनिमित्त बुध्द भूमीत अवतरले असून, या पदयात्रेच्या माध्यमातून तथागतांचा विचार जनसामान्यात पोहचविण्याचे काम केले जात आहे, असे प्रतिपादन जागतिक बौद्ध धम्म गुरु भंते लांगफुजी यांनी मंगळवारी (ता.१७) केले.

थायलंड येथील ११० भिक्खूंच्या उपस्थितीत परभणी ते चैत्यभूमी दादर, ऐतिहासिक भव्य धम्म पदयात्रा प्रस्थान सोहळा मंगळवारी (ता. १७) ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मैदानावर हजारो अनुयायांच्या उपस्थितीत पार पडला. या निमित्त बुद्धांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. या धम्म पदयात्रा सोहळ्याचे आयोजन सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी केले आहे.

धम्म पदयात्रेचे उद्‍घाटन भंते लाँगफुजी (जागतिक बौद्ध धम्म गुरु, थायलंड) यांच्या हस्ते झाले. यावेळी भंते सोंगसेन फॅटफियन (थायलंड), भंते विचीयन अबोत (श्रीराजगिर) थायलंड , भंते डॉ. उपगुप्त महाथेरो (पूर्णा), डॉ. भीमराव आंबेडकर, सिने अभिनेता गगन मलिक, कॅप्टन नटकिट (थायलंड), सिरीलक मैथाई (थायलंड) यांची प्रमुख उपस्थिती होती. खासदार संजय जाधव, आमदार सुरेश वरपुडकर, आमदार डॉ. राहुल पाटील, आमदार संतोष बांगर यांनी पदयात्रेला शुभेच्छा दिल्या.

भंते लांगफुजी म्हणाले की, या पदयात्रेच्या माध्यमातून भारत आणि थायलंड या दोन महान देशाचे मैत्री पूर्ण संबंध प्रस्थापित होण्यास मदत होणार आहे. ही पदयात्रा केवळ जगाला शांतीचा संदेश देवून तथागत गौतम बुद्धाचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहण्याचे काम करण्यासाठी व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

भगवान बुद्धाचे विचार जे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होते. ती क्रांती पुन्हा आणण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. या पदयात्रेच्या माध्यमातून मैत्री भाव वाढवावा, दुःख मुक्त होण्यासाठी भगवान बुद्धांचा विचारच अंगीकारावा, असे आवाहनही त्यांनी केले.

ऐक्य दाखविण्यासाठी पदयात्रा

समग्र बौद्ध समाज एकत्र यावा, यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. सामाजिक संघटनांमधील फूट दूर करून आपले ऐक्य दाखविण्यासाठी ही पदयात्रा निश्चित प्रेरणादायी ठरेल, असे मत डॉ. भीमराव आंबेडकर यांनी व्यक्त केले.

भारतीयांना न्याय देणारे संविधान शक्तीशाली करण्यासाठी जगात व देशात शांतता निर्माण व्हावी, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय, धर्मनिरपेक्षता या मानवी मूल्यांची प्रतिष्ठापना व्हावी, यासाठी ही ऐतिहासिक धम्म पदयात्रा काढली आहे. परभणीला ही पदयात्रा आयोजित करण्याचे भाग्य मिळाले. ही ऐतिहासिक भूमी आहे. या ऐतिहासिक भूमीतून हा नवा विक्रमही आम्ही प्रस्तावित केला आहे.

- सिध्दार्थ हत्तीअंबीरे, मुख्य आयोजक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com