परभणी तापली !; पारा @ ४४.२ अंशावर 

file photo
file photo
Updated on

परभणी : संपूर्ण राज्यात कोरोना विषाणुच्या संसर्गाने कहर केला असतांना परभणीतील नागरीक मात्र शनिवारी उष्णतेने हैराण झाले. शहराचे दिवसभराचे तापमान ४४.२ अंश इतके नोंद झाले. या वर्षातील हे सर्वांत उच्च तापमान आहे. गतवर्षी याच दिवशी परभणी शहराचे तापमान ४२ अंश इतके नोंदविले गेले होते. 

परभणी शहरात १५ दिवसापासून उन्हाचा पारा वाढत आहे. दरवर्षी परभणी शहराचे तापमान ४४ अंशाच्याही पुढे सरकते. जसा उन्हाळा सुरु झाला तेव्हापासून सर्वांचे लक्ष कोरोना विषाणु संसर्गावरच आहे. परंतू शुक्रवारपासून लोकांना शहराच्या तापमानात झालेली वाढ सहय्य होत होती. शनिवारी तर या तापमानाच्या पाऱ्याने कहरच केला. हे तापमान ४४.२ अंश सेल्सिअस इतके नोंदविल्या गेले आहे. सहसा सकाळी १० वाजल्यापासूनच शहरात उन्हाचे चटके सुरु होत आहेत. भर दुपारी भयंकर उन्हाचा कडाका राहत आहे. लॉकडाऊनमुळे कुणीही बाहेर पडत नसल्याने लोकांना उन्हाच्या पाऱ्याची जाणीव होताना दिसत नाही. परंतू सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत उन्हाची तिव्रता जाणवत होती. 

गतवर्षी याच दिवशी तापमान ४२ अंश 
राज्यात कोरोना विषाणुचा संसर्ग वाढल्याने सर्वजन हैराण आहेत. परंतू सध्या तरी परभणी जिल्हा ऑरेंज झोन मध्ये असतांनाही उष्णतेचा येथील लोकांना सामना करावा लागत आहे. आगामी काळात उन्हाचा पारा ४६ अंशापर्यंत जावू शकतो असा अंदाज हवामान शास्त्र तज्ञांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, गतवर्षी २०१९ मध्ये याच दिवशी परभणी शहराचे तापमान ४२ अंश इतके नोंद झाले होते.

एसी, कूलर ठेवले बंद 
दरवर्षी मार्च महिन्यात अडगळीला पडलेले कूलर बाहेर काढून त्याची साफसफाई आणि नादुरुस्त असल्यास दुरुस्त करण्यात येते. थंडावा मिळण्यासाठी त्याचे वाळे बदलले जातात. तसेच कुणी नवीन कूलर, वातानुकूलित यंत्र, पंखे खरेदी करतात. त्यामुळे बाजारपेठेत मोठी उलाढाल होत असते. कूलर व्यवसायातून हाताला काम आणि नागरिकांना थंडावा मिळतो. यंदा मात्र कोरोनामुळे एप्रिल सुरू झाला तरी कूलर लावण्याची हिंमत कोणी करत नव्हते. कोरोना विषाणूला रोखण्यासाठी थंड वातावरण ठेऊ नका, असे यापूर्वी सांगितले जात असल्याने बहुतांष लोकांनी आपले एसी, कूलर बंद ठेवले होते. परंतु, आता उष्णतेची असह्य करणारी लाट सुरू झाल्याने आता एसी नाही तर किमान काही वेळासाठी कूलर लावणे आवश्यक झाले आहे. त्यामुळे नागरिक घरातील जुणे कूलर लावत आहेत. परंतु, अनेकांचे कूलर नादुरस्त आहेत, तर कुणाला नवीन घ्यायचे आहे. मात्र, लॉकडाउनमुळे सर्व काही ठप्प असल्याने उकाडा सहन करण्याशिवाय पर्याय नाही. कूलर दुरुस्ती, विक्री सुरू नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.  अनेकांचे पंखेदेखील नादुरुस्त झाल्याने त्यांची अडचण झाली आहे. अनेकांनी आपल्या नेहमीच्या इलेक्ट्रिशियनला संपर्क साधून नादुरुस्त पंखे, कूलर दुरुस्त करण्यास बोलवत आहेत. परंतु, कोरोनाच्या भीतीने कुणीही कुणाच्या घरी जाण्यास तयार नसल्याने दुरुस्त करणारे इलेक्ट्रिशियनदेखील घराबाहेर पडण्यास टाळत आहेत. त्यामुळे घालमेल सहन करण्याशिवाय पर्याय नाही.

लाखो रुपयांचे साहित्य पडून
अनेक इलेक्ट्रिशियन, कारागिरांनी मार्च महिन्यापूर्वी कूलरचे साहित्य खरेदी केले आहे. सर्वाधिक मागणी डेझर्ट कुलरला असल्याने या कूलरचे सुटे भाग आणून कारागीर घरबसल्या असे कूलर तयार करून विक्री करत असतात. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणात लाखो रुपयांची खरेदी करून साहित्य आणले आहे. परंतु, लॉकडाउनमुळे मागणी असूनही कूलर तयार करता येत नाहीत आणि विक्रीदेखील होत नाही. त्यामुळे असे व्यावसायिक अडचणीत आले आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Deputy Collector Eknath Bangale inspected seized illegal sand stock and reviewed security, distribution, and e-auction plans in Gangapur taluka
The Education Department appointed two teachers at Sayyadpur ZP School after villagers protested against the shortage of teaching staff.
Progressive farmer Govardhan Ugle received the Maharashtra Krushibhushan Award for outstanding achievements in organic farming.
Food Safety Department inspection alerts triggered shop closures amid concerns over gutkha sales and loose edible oil distribution.
Marathi News Esakal
www.esakal.com