esakal | परभणी : व्हाटशाॅप, फेसबुकवर सेलू- पाथरी या खड्डेमय रस्त्याची गाजतेय चर्चा
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

सेलू- पाथरी हा रस्ता पूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होता.हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे.

परभणी : व्हाटशाॅप, फेसबुकवर सेलू- पाथरी या खड्डेमय रस्त्याची गाजतेय चर्चा

sakal_logo
By
विलास शिंदे

सेलू ( जिल्हा परभणी ) - सेलू ते पाथरी या २४ किलो मीटर अंतराच्या रस्त्याची पूर्णपणे दैना झाल्याने प्रवाशांचे अतिशय हाल होत आहेत.पाथरी शहर हे शिर्डीच्या साईबाबांचे जन्मगाव तर सेलू हे त्यांचे गुरू श्री.केशवराज बाबासाहेब महाराज यांचे गाव आहे.दोन्ही शहरांना अध्यात्मिक दृष्ट्या अत्यंत महत्व असल्याने या रस्त्याची व्हाॅटशाप,फेसबुकवर तरूण प्रवाशी पोस्ट टाकून अधिकारी,लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करित आहेत.

सेलू- पाथरी हा रस्ता पूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होता.हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे.आता हे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यालय, जालना यांच्याकडे वर्ग झाल्याने रस्त्याच्या दूरूस्ती बद्दल विचारायचे कुणाला? असा यक्ष प्रश्न सेलूकरांना उपस्थित होत आहे.सेलू-पाथरी हा २४ कि.मी.चा रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला आहे.अनेक वेळा या रस्त्यावर खड्यांमुळे छोट- मोठे अपघात होतात.

हेही वाचा -  हिंगोली : सेनगावात अन्न सुरक्षा योजनेत सावळा गोंधळ, पुरवठा विभागाचे दुर्लक्ष 

तसेच नागरिकांच्या वाहनांचेही नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे. वाहन धारकांच्या पाठ दुःखी, मान दुःखीने सुद्धा वाहनधारक हैराण आहेत. याच रस्त्यावर सिमुर गव्हाण पाटीजवळ नरेंद्र महाराज यांचा आश्रम आहे.त्यांचे भक्तगण बाहेरजिल्ह्यातून येथे येत असतात. परंतु या खड्डेमय रस्त्यांमुळे भक्तगणात नाराजी पसरली आहे. या रस्त्याचे काम लवकारात लवकर व्हावे यासाठी तरूण वर्ग व्हाॅटशाप,फेसबुकवर या रस्त्याचे फोटो टाकून संबधित अधिकार्‍यांना व लोकप्रतिनिधिंना खड्डेमय रस्ताची सतत आठवण करून देत आहेत.

सेलू ते पाथरी या २४ कि.मी.अंतराच्या रस्त्याचे खड्डे बुजविण्याचे काम येत्या दोन दिवसात सुरू होईल.व रस्ता दूरूस्तीचे काम ( ता.१५ ) डिसेंबर—२०२० पासून सुरू होईल अशी माहिती परभणीचे संबधित कंत्राटदार सुधिर पाटील यांनी दिली.

काम करून घेऊत. 

सेलू ते पाथरी रस्त्याचे कंत्राट परभणी व वसमत येथील कंत्राटदाराला मिळाले आहे.या रस्त्याचे काम लवकर सुरू करूत अशी माहिती जालना येथिल कार्यकारी अभियंता श्री.चांडक यांनी दिली.

loading image