esakal | परभणी : वैद्यकीय महाविद्यालयासाठी व्यापाऱ्यांचा बंद
sakal

बोलून बातमी शोधा

parbhani

परभणी : वैद्यकीय महाविद्यालयासाठी व्यापाऱ्यांचा बंद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

परभणी : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजुरीसाठी खासदार संजय जाधव यांनी सुरु केलेल्या सर्वपक्षीय धरणे आंदोलनास आता व्यापक स्वरुप आले आहे. शनिवारी (ता.चार) जिल्ह्यातील सर्व व्यापाऱ्यांनी त्यांची प्रतिष्ठाणे दुपार पर्यंत बंद ठेवत धरणे आंदोलनात सहभाग नोंदविला. राज्य शासनाने तातडीने या संदर्भात निर्णय जाहीर करून शासकीय वैद्यकीय महाविद्यायास मंजुरी द्यावी अन्यथा येत्या सात सप्टेंबर पासून जिल्हयातील बाजारपेठा बेमुदत बंद ठेवल्या जातील असा इशारा जिल्हा व्यापारी महासंघाने दिला आहे.

शासकीय वैद्यकीय महाविदयालयास मंजुरी द्यावी या मागणीसाठी शनिवारी जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी दुपार पर्यंत आपआपली प्रतिष्ठाणे बंद ठेवली. यात औषधी दुकानाचाही समावेश होता. व्यापाऱ्यासह डॉक्टर, वकील, प्राध्यापक व साहित्यिकांनी धरणे आंदोलनात त्यांचा सहभाग नोंदविला. शनिवारी सकाळी अकरा वाजल्यापासून व्यापाऱ्यांनी दूकाने बंद ठेवून आंदोलनस्थळी हजेरी लावली. जिल्हा व्यापारी महासंघाचे पदाधिकारी, सदस्यांसह हजारो व्यापारी या आंदोलनस्थळी उपस्थित होते.

हेही वाचा: 'कोल इंडिया'मध्ये नोकरीची उत्तम संधी! 9 सप्टेंबरपर्यंत करा अर्ज

या व्यतिरिक्त जिल्हा मेडिकल असोसिएशन, जिल्हा वकील संघ, प्राध्यापक संघटना,विविध शैक्षणिक संस्थांचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक,पी.डी.जैन होमिओपॅथी महाविद्यालयाचे पदाधिकारी, विद्यार्थी तसेच साहित्य क्षेत्रातील साहित्यिक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी खासदार संजय जाधव, आमदार डॉ.राहूल पाटील, माजी आमदार सुरेश देशमुख, व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत हाके, कार्याध्यक्ष नितीन

वट्टमवार, सचिव सचिन अंबिलवादे, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख डॉ. विवेक नावंदर, प्रभाकर पाटील वाघीकर, अतुल सरोदे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम, गंगाप्रसाद आनेराव आदींची उपस्थिती होती.

नवीन वैद्यकीय महाविद्यालयामुळे शहराची, जिल्हायाची प्रगती होणार आहे. शहरची ओळख एक शैक्षणिक व सांस्कृतीक शहर अशी होणार आहे. यामुळे व्यापार वेगाने वाढतील, नोकरीची साधणे निर्माण होती. परिणामी बेरोजगारी कमी होणार आहे. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिळायलाच हवे आहे.

- सूर्यकांत हाके, जिल्हाध्यक्ष, व्यापारी महासंघ,परभणी

हेही वाचा: पोळा सणानिमित्त परभणीची बाजारपेठ सजली

...अन्यथा सात सप्टेंबर पासून बाजारपेठ बेमुदत बंद

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागणीसाठी आम्ही परभणीकरांनी सुरू केलेल्या लढाईची राज्य सरकारने दखल घ्यावी, अन्यथा खासदार संजय जाधव यांनी सात सप्टेंबर पासून बेमुदत उपोषण सुरू केल्यास त्या लढाईस समर्थन म्हणून परभणी शहरासह जिल्ह्यातील सर्व व्यापारी व्यापारीपेठा पूर्णतः बंद ठेवून समर्थन देतील अशी इशारा जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सूर्यकांत हाके यांनी दिला आहे.

loading image
go to top