
परभणीत गंगाखेड तालुक्यात एक हृदयद्रावक घटना घडली. विवाहित महिलेने आपल्या दोन वर्षांच्या चिमुकल्यासह नदीत उडी मारुन जीवन संपविले आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना शनिनारी संध्याकाळी घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. या प्रकरणाचा तपास सुरु आहे.