Parbhani Incident
esakal
परभणी : ओबीसींचे आरक्षण (OBC Reservation) संपल्यामुळे उद्भवलेल्या नैराश्यातून परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील एका २२ वर्षीय तरुणाने आत्महत्या केलीये. 'आरक्षण गेल्यामुळे आता आपल्या भविष्याबाबत (Parbhani Incident) काहीही खात्री नाही. या आरक्षणाच्या आधारेच चांगले दिवस येतील अशी अपेक्षा होती. मात्र, आता समाजाचे आणि आपले भविष्य अंधारमय झाले आहे. मी ओबीसी समाजासाठी माझे आयुष्य संपवण्याचा निर्णय घेत आहे,' असे त्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात नमूद केले.