

Parbhani ZP President Election
esakal
परभणी: जिल्ह्यातील नऊ पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापतींची निवड प्रक्रिया पूर्ण होताच आता सर्वांचे लक्ष जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीकडे लागले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वाधिक २५ जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला तरी स्पष्ट बहुमतापासून तो चार जागांनी दूर आहे.
त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी भाजपला इतर पक्षांच्या सदस्यांची साथ आवश्यक ठरणार आहे. सद्यस्थितीत जिल्हा परिषदेत भाजपकडे २५ सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेसकडे १५, शिवसेनेकडे ५, शिवसेना (उबाठा)कडे ६, काँग्रेसकडे ३ आणि एक अपक्ष सदस्य आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेची समीकरणे गुंतागुंतीची बनली असून विविध राजकीय हालचालींना वेग आला आहे.