Video : परभणीकरांनी दिल्या ‘भारत माता की जय’च्या घोषणा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 मे 2020

स्वतःचा जीव धोक्यात ठेवून ‘कोविड१९’ या विशेष कक्षामध्ये रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टरचा परभणीकरांनी घोषणा देत सन्मान केला.

परभणी : शहरातील शिवराम नगर भागात राहणारे डॉक्टर विशाल पवार हे गेल्या तीन महिन्यापासून परभणीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात कोविड१९ केंद्रावर रुग्णांची सेवा करत आहेत. मंगळवारी डॉक्टर विशाल दररोज प्रमाणे आपल्या कर्तव्यावर जात असताना शिवराम नगर परिसरातील नागरिकांनी त्यांच्या घराबाहेर जमून व कॉलनीत रांगेत उभे राहून त्यांचे स्वागत केले. कॉलनी वासियांनी अचानक केलेल्या या स्वागतामुळे डॉक्टर विशाल काहीकाळ भारावून गेले.

परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात covid-19 या आजारासाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आला आहे. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरसह काही खाजगी डॉक्टरांनीही या ठिकाणी सेवा देण्यास सुरुवात केली आहे. यात शिवराम नगर परिसरातील डॉ. विशाल पवार हे देखील गेल्या तीन महिन्यापासून कोरोना विषाणू संक्रमित रुग्णांची व संशयित रुग्णांची सुश्रुषा करत आहेत. डॉ. विशाल दररोज सकाळी रुग्णालयात जातात आठ ते बारा तासाची ड्युटी केल्यानंतर ते घरी येतात. 

हेही वाचा - Parbhani Breaking : २१ वर्षीय युवकाला कोरोनाची बाधा, संख्या सातवर

दररोज प्रमाणे डॉ. विशाल पवार मंगळवारी (ता.१९ मे) सकाळी रुग्णालयात जाण्यासाठी निघाल्यानंतर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. कारण कॉलनीमधील रहिवासी डॉ. विशाल यांच्या सेवेप्रति आदरभाव व्यक्त करण्यासाठी एकत्रित आले होते. या भागातील नगरसेवक सचिन देशमुख यांच्या पुढाकारातून हा कृतज्ञता सोहळा पार पडला. यावेळी कॉलनी वासियांनी डॉक्टर विशाल यांच्यावर पुष्पवृष्टी केली. तसेच टाळ्या वाजवून डॉ. विशाल पवार यांच्या प्रति आपुलकीचा भाव व्यक्त केला.

दरम्यान कॉलनी वासियांनी दाखवलेल्या प्रेमामुळे डॉक्टर विशाल पवार भारावून गेले. याप्रसंगी अभिजीत ब्रह्मनाथकर, नगरसेवक सचीन देशमुख, नगरसेवक चंदु शिंदे, अशोक सालगुडे, संजय भोसले, योगेश कदम, बबन ढगे, डाॅ.सुभाष देशमुख, शिवाजी रोकडे, हिरालाल देवतवाल, चंपालाल देवतवाल, रणजित कारेगांवकर, रुपेश देशमुख, योगेश मुंडे, श्रीकांत कदम, विवेक पवार, नंदकुमार गरुड, सतिश जवर, लक्ष्मण खटींग,कल्याण अवचार, उत्तम आहेर, श्री. बोधनकर, श्री. लाटे, श्री.घुगे, श्री.कुरे व सर्व महीलांनी पुष्पवृष्टी करत टाळ्या वाजवून कौतुक केले. उपस्थितांनी ‘भारत माता की जय’, ‘हम सब एक है’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parbhanikar's Announcement Of 'Bharat Mata Ki Jai'