
कोरोनाचे नियम पाळून केली जयंती साजरी ; प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका
प्रज्ञासुर्याला परभणीकरांचे अभिवादन, मिरवणुकीशिवाय भिमजयंती
परभणी ः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्य परभणीकरांनी बुधवारी (ता. 14) कोरोनाचे नियम पाळत अभिवादन केले. प्रशासनाने केलेल्या आवाहनाला साथ देत यंदाही जयंती मिरवणुक काढण्यात आली नाही. उलट बाबासाहेबांनी घालून दिलेल्या शिकवणीवर चालत अनेक
सामाजोपयोगी उपक्रम राबवून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.
परभणी जिल्ह्यात दरवर्षी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. परंतू गेल्या वर्षीपासून कोरोना विषाणु संसर्गामुळे जयंती मिरवणुकीवर काही प्रमाणात निर्बंध आले होते. असे असतांनाही थोडाही उत्साह कमी होऊ न देता विविध जयंती मंडळांनी त्यांच्या परीने समाजोपयोगी उपक्रम राबवून जयंती साजरी केली. सकाळी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, आमदार सुरेश वरपुडकर, महापौर अनिता सोनकांबळे, जेष्ठे नेते डी. एन. दाभाडे, विजय वाकोडे, युवानेते सिध्दार्थ हत्तीअंबिरे,डॉ. सिध्दार्थ भालेराव, आकाश लहाने, रविंद्र सोनकांबळे, प्रा. अरुणकुमार लेमाडे यांच्या सह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. यावेळी पंचशिल ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर उपस्थित नागरीकांनी ध्वजाला मानवंदना दिली. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, आमदार सुरेश वरपुडकर, महापौर अनिता सोनकांबळे यांनी सर्व नागरीकांना शुभेच्छा दिल्या.
हेही वाचा - कोरोनामध्ये उद्योग व्यवसायही जगला पाहिजे : प्रदीप पेशकार
झाडांच्या पानापासून साकारली अनोखी कलाकृती
परभणी युवा मंच व डी- सेवन आर्टच्या पुढाकारातून काही कलावंतांनी विविध झाडांच्या पानापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अनोखी प्रतिमा, कलाकृती साकारली. प्रमोद उबाळे, एम. व्ही. आढे, रोहिणी सावंत, अंबिका गायकवाड, ज्योती रणेर, माया काळे, वैष्णवी साबळ, ज्ञानेश्वर सांगळे या कलावंतांनी तब्बल बारा तास केलेल्या प्रयत्नातून ही अनोखी कलाकृती साकारली. विविध झाडांच्या जवळपास एक हजार 115 पानांना रंग देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा साकारण्यात आली.
सर्वधर्मीय जयंती समितीच्या वतीने मास्कचे वाटप
सर्वधर्मीय फुले- शाहु- आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने भीम जयंती दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुर्णाकृती पुतळ्या जवळ भीम अनुयायांना सॅनिटायझर, मास्कची उपलब्धता करुन देण्यात आली होती. यशवंत मकरंद, प्रा. डॉ. सुरेश शेळके, किशोर रणेर, डी. सी डुकरे, नागेश कूलकर्णी, जी. डी. पोले, अॅड अफजल बेग, परमेश्वर जवादे, सुधिर साळवे, संजिव आढागळे, भुषण मोरे, रवि पंडित आदी मान्यवर उपस्थित होते.
संपादन- प्रल्हाद कांबळे
Web Title: Parbhanikars Greetings Pragyasurya Bhim Jayanti Without Procession
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..