esakal | परळी मतदारसंघाचा बारामतीसारखा विकास होईल : मंत्री जयंत पाटील Jayant Patil
sakal

बोलून बातमी शोधा

Marathwada

परळी मतदारसंघाचा बारामतीसारखा विकास होईल : मंत्री जयंत पाटील

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

परळी : जिल्ह्यातील नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी महाविकास आघाडी सरकार भक्कमपणे उभे राहील. तसेच राज्य सरकार प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यांच्या आधारे नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला मदत करणार आहे. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या हातून आगामी काळात परळी मतदारसंघाचा बारामतीसारखा विकास होईल. यासाठी परळीकरांनी कायम पाठीशी राहून मंत्री मुंडे यांना पाठबळ द्यावे असे आवाहन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केले.

जयंत पाटील यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी परिवार संवाद दौऱ्याच्या तिसऱ्या पर्वातील संवाद यात्रा सोमवारी (ता.२७) सायंकाळी परळी मतदारसंघात पोहोचली असता जयंत पाटील यांनी परळी मतदारसंघात बैठक घेतली. बैठकीचे रूपांतर मेळाव्यात झाले. यावेळी ते बोलत होते. पुढे मंत्री पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी महाविकास आघाडी सरकार भक्कमपणे उभे राहील. तसेच राज्य सरकार प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यांच्या आधारे नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला मदत करणार आहे. परळी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बांधणी परिपूर्ण असून येथे आढावा घेण्याची गरजच नाही.

हेही वाचा: मोदी सरकारविरोधात RSSच्या संघटना उतरणार रस्त्यावर

येथे पक्ष संघटना अगदी परिपूर्ण आहे. पक्षाच्या आढावा बैठकीच्या बाबतीत धनंजय मुंडे आणि त्यांची टीम पास झाली, असे मतही जयंत पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी बोलताना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर मला सर्व स्तरावर खलनायक ठरविण्यात आले. लोकांच्या भावनिक प्रचारामुळे अनेकांनी मला शिव्या घातल्या, परंतु परळीच्या मातीतील माणसांनी मला उभारी दिली.

हेही वाचा: शरदचंद्र पवार : अद्भूत किमया करण्याची रुबाबी कसरत करणारा लोकनेता

पक्षाचे नेते खासदार शरदचंद्र पवार यांनी मला संधी दिली यामुळे आज मी राज्याचा मंत्री होऊ शकलो. या मातीचे व पक्षाचे ऋण मी कधीही फेडू शकणार नाही, असे प्रतिपादन मंत्री मुंडे यांनी केले. कार्यक्रमास आमदार संजय दौंड, जिल्हा परिषद अध्यक्षा शिवकन्या सिरसाट, जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, जयसिंगराव गायकवाड, महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, उषा दराडे, सुदामती गुट्टे, युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, पक्ष निरीक्षक जीवनराव गोरे, डॉ.सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, युवती आघाडी प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, अजय मुंडे, बाजीराव धर्माधिकारी, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयसिंह सोळंके, रामेश्वर मुंडे, सुरज चव्हाण, नगराध्यक्ष सरोजनी हालगे, उपनगराध्यक्ष शकील कुरेशी, वाल्मिक कराड, गोविंदराव देशमुख, राजेश्वर चव्हाण, दत्ता पाटील, बालाजी मुंडे, ॲड. गोविंद फड, शिवाजी सिरसाट आदी उपस्थित होते.

loading image
go to top