परळी : पाइपलाइन फुटली, लाखो लिटर पाणी वाया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Parli pipeline burst water wasted

परळी : पाइपलाइन फुटली, लाखो लिटर पाणी वाया

परळी वैजनाथ : शहरातील मुख्य बाजारपेठेतील सोनार लाइनच्या रस्त्यावर सोमवारी सकाळी नगरपालिकेच्या पाणी पुरवठा योजनेची पाइपलाइन फुटून भर उन्हाळ्यात लाखों लीटर पाणी वाया गेले. यास जबाबदार असणाऱ्या अधिकाकी-कर्मचाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

शहरात सध्या भुयारी गटार योजनेचे काम सुरू असून हे काम करत असताना अनेक ठिकाणी नगरपालिकेची तसेच नागरिकांच्या नळांची पाइपलाइन जेसीबी मशीनने काम सुरू असल्याने फुटते. काही नागरिकांचे नळ संयोजन जोडून दिले जात आहेत तर काहींना स्वतः त्याचा खर्च करावा लागत आहे. यामुळे शहरातील रहिवासी अगोदरच बेजार झाले आहेत. अशातच शहरातील मुख्य बाजारपेठेतील सोनार लाइनच्या रस्त्यावर भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे. जेसीबी मशीनने खोदकाम सुरू असताना नगरपालिकेची मुख्य पाइपलाइन फुटली.

सोमवारी सकाळी या परिसरात पाणी पुरवठा योजनेचे पाणी आले असता, पाइपलाइन फुटलेली असल्याने या रस्त्यावर चक्क नदीसारखे पाणी वाहू लागले. पाऊस न पडता रस्त्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाणी कसे वाहू लागले असा प्रश्न नागरिकांना पडला होता. नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागास याचा थांगपत्ताही नव्हता. लाखो लीटर पेयजल वाया जात असल्याचे पाहून परिसरातील नागरिकांनी ही बाब संबंधित विभागास कळविली. यानंतर मुख्य लाईन बंद केल्यानंतर हे पाणी थांबले. तोपर्यंत भर उन्हाळ्यात लाखो लीटर पाणी वाया गेले.

दोन वर्षापूर्वी शहरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली होती. यावेळी नागरिकांना विकतही पाणी मिळत नव्हते. दरम्यान शहरात तीन ते चार दिवसाआड पाणी पुरवठा सुरू आहे. काही वेळा अडचणीमुळे आठ दिवसाला पाणी पुरवठा होत असताना दुसरीकडे असे मोठ्या प्रमाणावर पाणी वाया घालवणे कितपत योग्य आहे. यामुळे यास जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Web Title: Parli Pipeline Burst Water Wasted Demand Action Against Responsible Officials

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top