

dipak deshmukh parli
esakal
Beed Crime News: नगर परिषद निवडणुकीनंतर मतदान यंत्र स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आले. त्यानंतर या स्ट्राँग रूमवर निगराणी ठेवण्यासाठी आम्हाला गादी पलंगासह प्रवेश द्या, अशी मागणी नगरसेवकपदाचे उमेदवार दीपक देशमुख यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह केली. ३ डिसेंबरला रात्री अकराला परळी नगर परिषद कार्यालयासमोर २० जणांच्या गटाने घोषणाबाजी केल्याची घटना समोर आली. याप्रकरणा परळी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रघुनाथ नाचन यांनी फिर्याद दिली. दीपक देशमुखांसह २० जणांवर गुन्हा नोंद केला आहे.