

Parli Rain Update Sirsala Records 112 Mm Gade Pimpalgaon 107 Mm As Heavy Rain Brings Relief To Farmers And Crops
sakal
-लक्ष्मण वाकडे
परळी वैजनाथ: दीर्घ विश्रांतीनंतर परळी तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली असून काल मध्यरात्रीनंतर सुरू झालेला पाऊस सकाळी थांबला. परळी तालुक्यातील सिरसाळा मंडळात बीड जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे 112 मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्या खालोखाल तालुक्यातील गाडे पिंपळगाव मंडळ 107 मिलीमीटर तर परळी मंडळात 88 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.