esakal | परळीतील केंद्रातून वीजनिर्मिती बंद, मिळणारा रोजगारही पडला बंद
sakal

बोलून बातमी शोधा

Parli tharmal power

परळी वैजनाथ येथील केंद्रातून होणारी ७५० मेगावॉट वीजनिर्मिती बंद करण्यात आली आहे. राज्यातील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पाऊस होत आहे.

परळीतील केंद्रातून वीजनिर्मिती बंद, मिळणारा रोजगारही पडला बंद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

परळी वैजनाथ (जि.बीड) : येथील केंद्रातून होणारी ७५० मेगावॉट वीजनिर्मिती बंद करण्यात आली आहे. राज्यातील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पाऊस होत आहे. त्यामुळे मागणी कमी झाल्याचे कारण देत येथील तिन्ही संच गेल्या दोन दिवसांपासून बंद करण्यात आले. आधीच कोरोनामुळे विविध समस्या असताना या केंद्रातून मिळणारा रोजगारही बंद पडला आहे.

येथील वीजनिर्मिती या ना त्या कारणांमुळे सातत्याने बंद असते. सुरवातीला एक हजार १०० मेगावॉट वीजनिर्मिती केली जात होती. मुदत संपल्याच्या कारणामुळे दोन संच कायमस्वरूपी बंद करून ते भंगारात काढले. त्यामुळे केंद्राची क्षमता ७५० मेगावॉटवर आली. सध्या ६,७,८ क्रमांकांचे संच कार्यरत आहेत. वीजनिर्मितीची प्रत्येकी क्षमता २५० मेगावॉट आहे.

मराठवाडा मुक्तिदिनी उदगीरच्या ऐतिहासिक किल्ल्यावर पहाटे ध्वजवंदन

कोळसा, पाण्याअभावी हे संचही अधूनमधून बंद ठेवले जातात. या दोन्ही बाबी उपलब्ध होऊन निर्मिती सुरळीत राहिली तर तुलनेने वीज महाग पडते हे कारण देत संच बंद ठेवले जातात. आठ क्रमांकाच्या संचाचे काम पूर्ण झाले आहे. या संचातून सलग वर्षभर २५० मेगावॉट वीजनिर्मिती झाल्यानंतर ज्या कंपनीने तो तयार केला आहे, त्यांच्याकडून महानिर्मिती केंद्रास तो हस्तांतरित करण्यात येणार आहे. हा संच कोळशावर सुरू केल्यास व्हायब्रेट होत असल्याची चर्चा आहे. तो कोळशाऐवजी ऑईलवर सुरू करत असल्याची चर्चा आहे.

ऊसतोड मजुरांना अडविल्याप्रकरणी आमदार सुरेश धस यांना अटक

अर्थकारणावर परिणाम
या वीज केंद्रावर शहरातील बरेचसे अर्थकारण अवलंबून आहे. केंद्र सातत्याने बंद राहत असल्याने मुख्य बाजारपेठेसह बेरोजगारावर विपरीत परिणाम होतो. काम बंद पडल्यास ठेकेदार कामगारांना रोजगार देत नाहीत. त्यामुळे बेरोजगारी वाढते. महानिर्मितीचेही लाखो रुपयांचे नुकसान होते.

संपादन - गणेश पिटेकर