

Parli Vaijnath Farmers
sakal
परळी वैजनाथ : तालुक्यातील पश्चिम भागात मंगळवारी (ता. १६) झालेल्या प्रचंड अतिवृष्टीमुळे अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून, शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. अशा संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर निदर्शने करत करण्यात आली.