esakal | परळी वैजनाथ : गावठी दारूचे अड्डे उद्ध्वस्त
sakal

बोलून बातमी शोधा

Gavthi daru adde

परळी वैजनाथ : गावठी दारूचे अड्डे उद्ध्वस्त

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

परळी वैजनाथ : तालुक्यातील धारावती तांडा येथे मोठ्या प्रमाणावर गावठी हातभट्टीची दारू तयार करून विक्री केली जाते. पोलिसांनी वेळोवेळी छापे टाकून गावठी दारुचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. मंगळवारी (ता.३१) सकाळी दारुबंदी मोहिमेंतर्गत धारावती तांडा गाव व परिसरात येथील ग्रामीण पोलिस ठाण्याच्या वतीने छापे टाकून अड्डे उद्ध्वस्त करण्यात.

धारावती तांडा येथे दारूबंदी मोहिमेंतर्गत सकाळी ९ ते ११ दरम्यान साहाय्यक पोलिस निरीक्षक एम.एस. मुंडे, पोलिस उपनिरीक्षक रोटेवाढ आणि सहकाऱ्यांनी गावात विविध ठिकाणी धाडी टाकून ५९ हजार ८०० रुपयांची गावठी दारू, साहित्य, रसायन जप्त केले. यातील दारू बनवण्याचे साहित्य नष्ट करण्यात आले. गावातील शेषबाई भगवान पवार, धुराबाई बाबूराव राठोड, अनिता बळीराम जाधव, वामन राम पवार, श्यामराव प्रभू पवार यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.

loading image
go to top