

Success Story
sakal
परतूर : परिस्थिती कितीही कठीण असली, तरी जिद्द, चिकाटी आणि मेहनतीसमोर कोणतीही अडचण मोठी ठरत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे परतूर तालुक्यातील एका अल्पभूधारक शेतकऱ्याच्या मुलीने. श्रेया शिवाजीराव उबाळे हिने बीएचएमएस डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार करून अनेकांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.