Soybean Market : हमीभावाने सोयाबीनच्या खरेदीला मुदतवाढ द्यावी; पाशा पटेल यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Soybean Procurement : राज्यात शासनातर्फे सोयाबीनची हमीभावाने खरेदी केली जात आहे. त्यात येणाऱ्या काही अडचणी दूर करून या खरेदीसाठी मुदतवाढ द्यावी, पाशा पटेल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
विधानसभा निवडणुकी दरम्यान राज्यातील सोयाबीन उत्पादकांना ‘एमएसपी’पेक्षा कमी बाजारभाव मिळत होता. शेतकऱ्यांना अधिकचा बाजारभाव मिळावा व बारा टक्के ते टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची खरेदी शासनामार्फत व्हावी यासाठी केंद्राकडे मागणी करण्यात आली होती.