Tuljapur Crime : वाहन अडवून प्रवाशांना मारहाण, लूट; दोघे जखमी
Passengers attacked : तुळजापूर धाराशिव मार्गावर अज्ञात दरोडेखोरांनी वाहन अडवून प्रवाशांवर हल्ला केला. लुटीमध्ये दोघे जखमी झाले असून, चार आरोपी पोलिसांनी अटक केली आहे.
तुळजापूर : वाहन अडवून प्रवाशांना मारहाण करीत त्यांना लुटल्याची घटना तुळजापूर - धाराशिव मार्गावर गुरुवारी (ता. १०) पहाटे घडली. दरोडेखोरांच्या मारहाणीत दोघे जखमी झाले. आठपैकी चौघा संशयितांना धाराशिव ग्रामीण पोलिसांनी पकडले आहे.