

Peace march in Umarga demanding justice for NEET students and protesting alleged lathi charge in Delhi
Sakal
उमरगा (जि. धाराशिव): नीट परीक्षेतील विद्यार्थ्यांवरील अन्याय, परीक्षा व्यवस्थेतील भ्रष्टाचार, दिल्लीतील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर झालेला अमानुष लाठीचार्ज, शिक्षणातील बाजारीकरण आणि नोकऱ्यांचे खाजगीकरण थांबवावे, या प्रमुख मागण्यांसाठी आज उमरगा शहरात शनीवारी (ता. २५) भव्य शांतता मोर्चा व प्रतीकात्मक उपोषण आंदोलन करण्यात आहे. जिजाऊ ब्रिगेड, ॲड. शीतल चव्हाण फाउंडेशन, साऊ एकल महिला समिती आणि विविध समविचारी सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या आंदोलनाला नागरिकांचा व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.