श्रमिकांच्या डोंगरावर दुःखाचे कळस

kurula.jpg
kurula.jpg
Updated on


कुरुळा, (ता. कंधार, जि. नांदेड) ः पोटाची खळगी भरण्यासाठी डोक्यावर श्रमाचा भार ‘ना कशाची तमा ना कशाची भीती’ कामाच्या शोधात शेकडो किमी अंतरावर चरितार्थ चालवण्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी आणि खटाटोप. घरी वृद्ध माता पिता आणि पोटची पोर बाळं चिमुकले भविष्य सोडून परराज्यात नशीब आजमाविण्यासाठी दरवर्षीच तांडवासियांची भटकंती पण यंदा त्यावरही सद्यस्थितीत कोरोनाच्या महामारीचा काळोख. श्रमातून संसाराचा गाडा हकण्यासाठी गेलेल्या मजुरांना आता टाळेबंदीमुळे येण्यास मज्जाव झाला. त्यामुळे वृद्ध आई-वडील डबडबल्या डोळ्यांनी हतबल होऊन वाट पाहत असल्याचे रामानाईक तांडा येथील चित्र आहे.

मजुरांचा भ्रमणध्वनीवरून संपर्क
कुरुळा गावापासून अवघ्या चार किमी अंतरावर डोंगरावर वसलेला रामानाईक तांडा ही बंजारा समाजाची लोकवस्ती. परिसरात हाताला काम नसल्याने प्रतिवर्ष खरीप हंगाम संपताच तांड्यातून माणसांचा जथा घरट्यापासून दूर जातो. यंदा मार्च महिन्यातील १२ आणि १३ तारखेला जवळपास साठ मजूर मिरची तोडणीच्या कामासाठी तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात गेल्याचे समजते. त्यापैकी तेलंगणात मेनकुर गावी २७ आणि राजापूर तांडा येथे १६ मजूर कामासाठी गेले आहेत. तर आंध्र प्रदेशात हैद्राबाद येथे एकूण १७ मजूर कामासाठी गेल्याची माहिती मिळते. दरम्यानच्या काळात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २२ मार्चपासून लॉकडाऊन घोषित केल्याने अनभिज्ञ असणाऱ्या मजुरांची व गावाकडील कुटुंबियांची तारांबळ उडाली. गावाकडे येण्याचे मार्ग बंद झाले अश्या परिस्थितीत मजुरांची व गावाकडील वृद्धांची व मुला बाळांची दयनीय अवस्था झाल्याचे चित्र आहे. या मजुरांचा भ्रमणध्वनीवरून संपर्क झाल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.


एकीकडे मजुराजवळील अत्यावश्यक गरजेपुरते राशन संपले असून तेथील आहार शरीरप्रकृतीस साथ देत नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. तर दुसरीकडे तांड्यावरील वृद्ध दाम्पत्यांना राशन पाण्यासाठी कुठल्याही लोकप्रतिनिधींनी साधी विचारपूस केली नाही. यापेक्षा मोठा दैवदुर्विलास कोणता असू शकतो. हतबल होऊन असवांच्या धारा गाळत वाटेकडे आस लावून बसण्याशिवाय कुठला पर्यायच त्यांच्यासमोर आता उरला नसल्याची खंत गावकरी व्यक्त करत आहेत. त्या मजूरांसाठी प्रशासनाने सर्व वैद्यकीय तपासण्या करून इ-पासची व्यवस्था करावी अशी रामानाईक तांडावासीयांची मागणी आहे.

प्रशासनाने गावाकडे आणण्याची व्यवस्था करावी

या वेळी मुलगा आणि सून कामासाठी परराज्यात गेले आहेत. त्यांची तीन मुलं इथे आहेत. पाडव्याच्या मुहूर्तावर एकवेळ राशन देण्यात आले त्यानंतर आमची कुणीही विचारपूस केली नाही, वाईट वाटते. असे दुधाबाई गोपीनाथ पवार, ग्रामस्थ रामानाईक तांडा यांनी सांगीतले. तसेच माझी तीन मुले व तीन सुना आणि त्यांची पाच मुले सोबत गेली आहेत. माझ्याबरोबर पाच मुले आहेत. कामासाठी गेलेल्या मुलांजवळील राशन संपले आहे. त्यांची प्रशासनाने गावाकडे आणण्याची व्यवस्था करावी अशी मागणी शेषकलाबाई गंपू पवार, ग्रामस्थ रामानाईक तांडा यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com