कुटुंब नियोजनाचे साहित्य मागवा आता ऑनलाईन!

people can order family planning kit Online
people can order family planning kit Online

डोंगरकिन्ही (जि. बीड) : अलिकडे सर्वच गोष्टी ऑनलाईन झाल्या आहेत. वैयक्तीक खरेदीपासून केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभही घेण्यासाठी मागणीचा प्रस्ताव ऑनलाईनच करावा लागत आहे. आता, शासकीय आरोग्य यंत्रणेमार्फत पूर्वी पुरविले जाणारे कुटूंब नियोजनाचे साहित्यही ऑनलाईन मागावे लागणार आहे. त्यामुळे आशा स्वयंसेविकांमार्फत मागणी नोंदवायची असल्याने आता ग्रामीण भागात विधवांसह अविवाहीत स्त्री - पुरुष अशी मागणी नोंदवतील का असा प्रश्न असून त्यामुळे सुरक्षित शारिरीक संबंध आणि कुटूंबनियोजनाचा उद्देश सफल होईल का, असाही प्रश्‍न आहे.  

आॅनलाईनमुळे काही योजनांचा निधी थेट खात्यावर वर्ग केल्यामुळे लाभार्थींना फायदा झाला. पण काही काही गोष्टीत यंत्रणेला व लाभार्थींना अडचणी येत आहेत. तर काही बाबतीत गमतीशीर अनुभव येत आहेत. आता तर शासनाने कुटुंब नियोजनाचे साहित्यही आॅनलाईन वाटप करण्याचे ठरविले आहे. कुटूंब नियोजनाचे निरोध, प्रेग्नन्सी टेस्ट किट, तांबी, तोंडावाटे घ्यावयाच्या गोळ्या आदी साहित्य पूर्वी शासकीय आरोग्य यंत्रणेला पुरविली जात. तेथून ते लाभार्थींना पुरविले जाई. परंतु, अनेक वेळा काही ठिकाणी या साहित्याला पाय फुटायचे तर काही ठिकाणी वापर न होताच साहित्याची मुदत संपून जायची. यावर उपाय म्हणून शासनाने ज्या आरोग्य केंद्रात जशी मागणी तसा पुरवठा करण्याचे ठरवले. मात्र मागणीही लाभार्थींना आॅनलाईन करावयाची आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा सेविकांनी लाभार्थी महिलांकडून मोबाईल मेसेजद्वारे मागणी नोंदवायची आहे. त्यानंतर त्यांनी ही मागणी परिचारीकेद्वारे प्रा.आ.केंद्राच्या फार्मासिस्टकडे नोंदवून लाभार्थींना साहित्य वाटप करावयाचे. यात असंख्य अडचणी येणार आहेत. यापुर्वी ग्रामिण भागातील पुरुष सहज आरोग्य केंद्रातुन साहित्य मागून घेत. आता लाभार्थी महिलांना या वस्तूची मागणी सेविकेकडे करावी लागणार आहे. विधवा व बिगरविवाहीत पुरुष सुरक्षित शारिरीक संबंधासाठी असे साहित्य मागतील का, असा प्रश्‍न आहे. त्यामुळे सुरक्षित शारिरिक संबंधन व कुटुंब नियोजन हा या साहित्याचा जो मुळ सफल होईल का, असाही प्रश्‍न आहे. कारण, या  योजनेच्या अंमलबजावणीसाठीची सक्षम  यंत्रणा शासनाकडे उपलब्ध नाही. योजनेची संपुर्ण माहितीही ग्रामीण भागातील आरोग्य कर्मचार्‍यांना नाही. 

कुटुंब नियोजन साहित्य वाटप करण्याच्या संदर्भात शासनाचे नविन निकष आले आहेत. मी नुकताच सेवेत रुजू झालेलो आहे. त्यामुळे याविषयी माहिती प्रा. आ. केंद्राच्या फार्मासिस्टकडे मिळेल.
- डॉ. मयुर शिंदे (वैद्यकिय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, डोंगरकिन्ही)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com