जनतेचा सरकारकडून अपेक्षाभंग : जयंत पाटील

पंजाब नवघरे
गुरुवार, 24 जानेवारी 2019

वसमत : केंद्र व राज्‍य शासनाच्‍या सर्वच योजना तकलादू असल्‍याने विकास दिसला नाही. त्‍यामुळे जनतेचा सरकारकडून अपेक्षाभंग झाल्‍याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत  पाटील यांनी गुरुवारी (ता. 24) पत्रकार परिषदेत केला आहे.

वसमत येथे आयोजित पत्रकार परिषदेस पाटील यांच्‍यासह माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर, आमदार रामराव वडकुते, राष्ट्रवादीचे जिल्‍हाध्यक्ष मुनीर पटेल, जिल्‍हा कार्याध्यक्ष दिलीप चव्‍हाण, हिंगोलीचे माजी नगराध्यक्ष जगजीत खुराणा यांच्‍यासह मान्यवर उपस्‍थित होते.

यावेळी पाटील म्‍हणाले की, शासनाने पाच लाख कोटी रुपयांपेक्षा जास्‍त कर्ज काढले आहे. कर्ज काढून योजनांचे भूमीपूजन केले. मात्र भांडवली गुंतवणूक झाली नाही तर पैसे गेले कुठे असा सवाल त्‍यांनी उपस्‍थित केला. या शासनाने विविध योजनांचे भूमीपूजन केले असले तरी त्‍या योजनांच्‍या उभारणीचे काम आमच्‍या सरकारला करावे लागेल असा टोला त्‍यांनी लगावला. 

जनतेने मागील निवडणुकीत भाजपला नव्‍हे तर नरेंद्र मोदी यांना मतदान केले. मात्र त्‍यांनीही जनतेचा विश्वासघात केला. भाजपला देशाचा विकास करता आला नाही. त्‍यामुळे आता या निवडणुकीत राममंदिराचा प्रश्न पुढे केला जात असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्‍मारक या सरकारला उभे करता आले नाही. मात्र आता निवडणुकीच्‍या तोंडावर शिवसेनेला खुश करण्यासाठी शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्‍याचा आरोप त्‍यांनी केला. निर्धार परिवर्तन यात्रेच्‍या माध्यमातून आम्‍ही सरकारच्‍या चुका जनतेसमोर आणणार असून देशाच्‍या निर्माणामध्ये आमची काय भूमिका असणार हे देखील स्‍पष्ट करणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

आगामी निवडणुकीत वंचित आघाडीसाठी अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ता. 30 जानेवारीची डेडलाईन दिली आहे. याबाबत बोलताना पाटील म्‍हणाले की, अॅड. आंबेडकर  यांच्‍याशी चर्चा सुरु आहे. त्‍यांना किती जागा द्यायच्‍या याबाबतचा निर्णय काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र मिळून ठरवणार असल्‍याचे त्‍यांनी स्‍पष्ट केले

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: people disappointed from Government says Jayant Patil