पोलिस ठाण्यात चोरीची वाहने विकत घेण्यासाठी नागरिकांची गर्दी

हिंगोली : चोरीतील वाहने घेण्यासाठी हजारो नागरिकांनी सकाळी दहा वाजल्यापासून पोलिस मुख्यालयात विनामास्क गर्दी केली होती.
हिंगोली : चोरीतील वाहने घेण्यासाठी हजारो नागरिकांनी सकाळी दहा वाजल्यापासून पोलिस मुख्यालयात विनामास्क गर्दी केली होती.सकाळ

हिंगोली : जिल्ह्यात १३ पोलिस ठाणेअंतर्गत चोरी (Crime In Hingoli) गेलेल्या दुचाकी पोलिसांनी चोरट्यांना अटक करून वाहने हस्तगत करून ठाण्यात लावल्या आहेत. त्यापैकी १९७ दुचाकीचा सोमवारी (ता.२६) जाहीर लिलाव करण्यात आला. यातून १४ लाख रुपयांची बोली लावलेल्या भंगार खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्याला देण्यात आल्या आहेत. चोरीच्या मोटारसायकलचा (Stolen Motorbike) शोध घेत २५० मोटारसायकल जप्त करण्यात आल्या होत्या. त्यापैकी ५० मोटारसायकल मूळ मालकाने कागदपत्रे देऊन नेल्या तर उर्वरित मोटारसायकलचा जाहीर लिलाव करण्यासाठी पोलिस प्रशासनाने प्रसिद्ध पत्रक काढून मोटारसायकल लिलाव संदर्भात माहिती दिली होती. त्याप्रमाणे सोमवारी १९७ वाहनांची लिलाव प्रक्रिया सुरू होती. यावेळी (Hingoli) नागरिकांनी वाहने घेण्यासाठी, पाहण्यासाठी गर्दी जमली होती.येथील पोलिस मुख्यालयात पोलीस अधीक्षक राकेश कलासागर (IPS Rakesh Kalasagar) यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक यशवंत काळे, सहायक पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, सरदारसिंग ठाकूर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय, किशोर पोटे यांनी लिलाव प्रक्रियेस सुरुवात केली. प्रारंभी एक, दोन वाहने विक्री होत नसल्याने संपूर्ण लॉट एकाच व्यक्तीला किंवा तो घेत नसेल तर विभागून ५० वाहने प्रमाने चार जणांना देऊ असे श्री.काळे यांनी सांगितले.(people get crowd for buying stolen motor bikes in hingoli glp88)

हिंगोली : चोरीतील वाहने घेण्यासाठी हजारो नागरिकांनी सकाळी दहा वाजल्यापासून पोलिस मुख्यालयात विनामास्क गर्दी केली होती.
मरणार असलो तरी तुम्ही चांगले जगा! मित्रांना पाठवला शेवटचा निरोप

वाहने घेण्यासाठी जवळपास ४२ लोकांनी दोन लाख डिपॉझिट भरणा करून नाव नोंदणी केली होती. या वाहनांची बाजार भाव प्रमाणे उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून (RTO) मूल्यांकन करण्यात आले. त्यानुसार आठ लाख २२ हजार किमत ठरली. या रकमेपासून बोली बोलण्यास सुरुवात झाली. १४ लाख दोन हजारावर थांबली. यावेळी अहमदनगर येथील कुकाना फाटा येथील तनवीर हमीद शहा व्यापाऱ्याने लिलाव प्रक्रियेत भाग घेऊन १९७ वाहने घेतली. वाहने रस्त्यावर धावणार नसून केवळ भंगार म्हणून यांचा उपयोग केला जाणार असल्याचे काळे यांनी सांगितले. चोरीतील वाहने घेण्यासाठी हजारो नागरिकांनी सकाळी दहा वाजल्यापासून पोलिस मुख्यालयात विनामास्क गर्दी केली होती. एक दोन गाड्याचा लिलाव नसून संपूर्ण गाड्या खरेदी करणाऱ्यांनी, डिपॉझिट भरणाऱ्या लोकांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन केल्यानंतर हौशी नागरिकांनी काढता पाय घेतला. त्यामुळे गर्दी आवाक्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com