
लातूर ः येथे गेल्या चार दिवसांपासून ऑनलाइन मद्यविक्री सुरू झाली असून मद्यपींच्या उड्या पडत आहेत. तीन दिवसांत ४८ हजारांवर नागरिकांनी ऑनलाइन मागणी नोंदविली. दुकानदारांनी २५ हजार नागरिकांना मद्यपुरवठा केला आहे. चार दिवसांत सुमारे ५५ हजार लिटर दारू विकली गेली असून शासनाला सुमारे एक कोटीचा महसूल मिळाला आहे.
लॉकडाउनचे नियम पाळून दारू विक्रीला परवानगी मिळाल्याने आठ-दहा दिवसांपूर्वी येथे एक दिवस वाईन शॉप सुरू झाले होते. इतर जिल्ह्यांत ते बंद होते. त्यामुळे येथे लातूरसह बीड, उस्मानाबाद, नांदेड जिल्ह्यांतून मोठी गर्दी झाली. गर्दीमुळे दारू दुकाने पुन्हा बंद करण्यात आली आणि ऑनलाइन विक्रीला परवानगी देण्यात आली. ऑनलाइन दारू खरेदीसाठी ग्राहकांना परवाना लागत आहे. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने ग्राहकांसाठीचे एक दिवसाचे २५ हजार परवाने दुकानदारांकडे दिले आहेत, तर एक वर्ष तसेच आजीवन स्वरूपाचे एक हजार नऊशे परवाने दिले आहेत. केवळ परवान्यांतून सुमारे दहा लाखांचा महसूल शासनाला मिळाला आहे.
...आणि मुलगीच निघाली पॉझिटिव्ह, मुंबईच्या जावयाचा बोरगावकरांना धक्का
पहिलाच प्रयोग
लॉकडाउनमुळे ऑनलाइन दारू मागणीचा हा पहिलाच प्रयोग आहे. तीन दिवसांत ४८ हजार ४०५ नागरिकांनी ऑनलाइनद्वारे मद्याची मागणी केली. शहरातील दुकानदार आतापर्यंत फक्त २५ हजार नागरिकांनाच दारू पुरवठा करू शकले आहेत. घरच्यांना कळू नये म्हणून अनेकांकडून दुसराच पत्ता देणे, डिलिव्हरी बॉयला दुसरीकडेच बोलावणे, अत्यंत कमी मागणी करणे असे प्रकार घडल्याचे समोर आले आहे.
चार दिवसांत मोठा महसूल
ऑनलाइन दारू विक्री सुरू होऊन चार दिवस झाले आहेत. या कालावधीत ५५ हजार लिटर विदेशी दारू, बिअरची विक्री झाली आहे. यातून शासनाला एक कोटीवर महसूल मिळाला आहे. दारूची वाढती मागणी लक्षात घेता लवकरच वाईन शॉपच्या ठिकाणी काउंटरवर विक्री करता येईल का, याचा विचार संबंधित विभागाने सुरू केला आहे.
सध्या ऑनलाइन मद्य विक्रीला परवानगी आहे. जिल्ह्यात ४५० परमिट रूम असून त्यांना पार्सल सेवेला परवानगी द्यावी, असा प्रस्ताव पाठविला होता. त्याला शासनाने अंशतः मान्यता दिली आहे. ही सेवा गुरुवारपासून सुरू करण्यात येणार आहे. २१ मार्चला असलेला साठाच परमिट रूमधारकांना पार्सलद्वारे विकता येईल. नव्याने साठा मागविता येणार नाही. प्रत्येकाकडील साठा तपासला जाणार असून तफावत आढळल्यास दंडात्मक कारवाई होईल.
- गणेश बारगजे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.