esakal | परभणी जिल्ह्यात पदवीधर मतदानाचा टक्का वाढला 
sakal

बोलून बातमी शोधा

42

मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी जिल्ह्यातून ६७.४३ टक्के मतदान झाले. सकाळपासूनच मतदानासाठी पदवीधर मतदारांमध्ये परभणी जिल्ह्यात उत्साह दिसून आला. 

परभणी जिल्ह्यात पदवीधर मतदानाचा टक्का वाढला 

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी ः मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी जिल्ह्यातून ६७.४३ टक्के मतदान झाले. सकाळपासूनच मतदानासाठी पदवीधर मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. दिवसभरात जिल्ह्यातील ७८ मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया अत्यंत शांततेने पार पडली. सुरुवातीपासून मतदानाची प्रक्रिया संथगतीनेच होत असल्याचे दिसून आले.
 
परभणी जिल्ह्यातील नऊ तालुक्यात एकूण ७८ मतदान केंद्रावर ही मतदानाची प्रक्रिया सकाळी आठ वाजल्यापासून सुरु झाली. जिल्ह्यातील ३२ हजार ७१५ मतदारांपैकी २२ हजार ६२ इतक्या मतदारांनी त्यांच्या मतदानाची हक्क बाजवला. यात पुरुष १८ हजार ३१० व तीन हजार ७५२ महिला मतदारांचा समावेश होता. 

६७.४३ टक्के मतदारांनी केले मतदान 
पहिल्या दोन तासात जिल्ह्यात ८.४३ टक्के मतदान झाले. त्यात ३२१ स्त्री व दोन हजार ४३८ पुरुष मतदारांनी मतदान केले. १२ वाजेपर्यंत मतदानाची आकडेवारी अजून वाढली. बारा वाजेपर्यंत २४.२३ टक्के मतदारांनी हक्क बजावला. त्यात एक हजार ८५ महिला तर सहा हजार ८४४ पुरुषांचा समावेश होता. दुपारी दोन वाजेपर्यंत ४१.०७ टक्के मतदान झाले. त्यात दोन हजार ६७ महिला व ११ हजार ३७० पुरुषांचा समावेश होता. सायंकाळी चार वाजेपर्यंत मतदानाची अर्धी टक्केवारी पार झाली होती. यावेळी ५८.६३ टक्के मतदान झाले. त्यात तीन हजार १६४ महिला व १६ हजार १८ पुरुष मतदारांचा समावेश होता. सायंकाळी पाच वाजता मतदान प्रक्रिया संपविण्यात आली. त्यावेळी एकूण मतदारांच्या ६७.४३ टक्के मतदारांनी यात मतदान केल्याचे स्पष्ट झाले. ३२ हजार ७१५ मतदारांपैकी १८ हजार ३१० पुरुष तर तीन हजार ७५२ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण झालेल्या मतदानामध्ये ५५.४२ टक्के महिला व ७०.५७ टक्के पुरुष मतदारांनी हक्क बजावला असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली. 

हेही वाचा - परभणीतून नऊ हजार ६०० रुपयांच्या खोट्या नोटा जप्त

वेळ मतदानाची टक्केवारी मतदारांचा सहभाग 
सकाळी आठ ते दहा ८.४३ टक्के ३२१ स्त्री व दोन हजार ४३८ पुरुष. 
दहा ते बारा २४.२३ टक्के एक हजार ८५ महिला तर सहा हजार ८४४ पुरुष 
बारा ते दोन ४१.०७ टक्के दोन हजार ६७ महिला व ११ हजार ३७० पुरुष 
दोन ते चार ५८.६३ टक्के तीन हजार १६४ महिला व १६ हजार १८ पुरुष 
चार ते पाच ६७.४३ टक्के तीन हजार ७५२ महिला व १८ हजार ३१० पुरुष 

हेही वाचा - परभणी : व्हाटशाॅप, फेसबुकवर सेलू- पाथरी या खड्डेमय रस्त्याची गाजतेय चर्चा

जिल्ह्याची संक्षिप्त माहिती 
एकूण ७८ मतदान केंद्र 
३२ हजार ७१५ एकूण मतदार 
२२ हजार ६२ मतदारांनी बजावला हक्क 
१८ हजार ३१० पुरुष तर तीन हजार ७५२ महिला मतदारांनी केले मतदान 
५५.४२ टक्के महिला व ७०.५७ टक्के पुरुष मतदारांनी केले मतदान 

तालुका मतदान केंद्र मतदार संख्या 
परभणी  २४  १३ हजार ४८३ 
पालम   सहा   एक हजार ६९७ 
पूर्णा     सात    दोन हजार ५५९ 
गंगाखेड सात  तीन हजार ६८९ 
सोनपेठ  चार   एक हजार ३३० 
सेलू     आठ  दोन हजार७७८ 
पाथरी   सहा   दोन हजार ४८ 
जिंतूर    दहा   तीन हजार ४२२ 
मानवत सहा  एक हजार ७०९ 

संपादन ः राजन मंगरुळकर