
अर्धापूर : शहर व तालुक्यात भटकंती करत कचरा गोळा करणाऱ्या एका व्यक्तीचा उपाशीपोटी राहिल्याने मृत्यू झाल्याची घटना शहरातील बसवेश्वर चौकात रविवारी (ता तीन) सकाळी उघडकीस आली आहे.या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. मयत व्यक्तीची ओळख पटली असून तो भोकर तालुक्यातील आमदरी या गावाचा रहिवासी आहे.या प्रकरणी अर्धापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.