

Independent MIDC in Phulambri Demanded to Create Local Jobs and Reduce Unemployment Among Educated Youth in the Region
esakal
-नवनाथ इधाटे
फुलंब्री : तालुक्यातील सततची दुष्काळी परिस्थिती, शेतीवर अवलंबून असलेली अर्थव्यवस्था आणि वाढती बेरोजगारी लक्षात घेता फुलंब्री येथे स्वतंत्र महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची (एमआयडीसी) औद्योगिक वसाहत उभारण्यात यावी, अशी मागणी शिव उद्योग सहकार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती चंद्रकांत जाधव यांनी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.