फुलंब्री - फुलंब्री शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती समोर असणाऱ्या गट नंबर 17/1 मध्ये बनावट एन.ए. करून नगररचना विभागाचे खोटे शिक्के मारून प्लॉटची विक्री करण्यात आली. सात वर्षापासून संबंधित प्लॉट धारक बांधकाम परवानगी मिळत नसल्याने त्रस्त आहे. त्यामुळे नगररचना विभागाचे खोटे शिक्के मारणारा मास्टर माईंड कोण.? असा प्रश्न सर्वसामान्य प्लॉट धारकांना पडला आहे.