गटविकास अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसविले डुक्‍कर

शिवाजी देशमुख
बुधवार, 19 जून 2019

सेनगाव (जि. हिंगोली) : येथील पंचायत समितीच्या कार्यालयात बुधवारी (ता. 19) दुपारी बारा वाजेपर्यंत एकही अधिकारी नसल्याने शिवसेनेचे जिल्‍हा उपजिल्‍हा प्रमुख संदेश देशमुख यांनी गटविकास अधिकाऱ्याच्या रिकाम्या खुर्चीवर डुक्‍कर बसवून अनोखे आंदोलन करून निषेध केला. 

सेनगाव येथील पंचायत समिती या ना त्‍या कारणाने नेहमीच चर्चेत असते गटविकास अधिकारी कारण सांगत वेळ मारू नेतात. येथे कामासाठी आलेल्या शेतकऱ्याची कामे वेळेवर होत नाहीत त्‍यांना दोन ते तीन चक्‍करा माराव्या लागतात. येथे एक कर्मचारी हजर असतो तर दुसरा नसतो यामुळे एकमेंकावर कामे ढकलली जातात. 

दरम्‍यान, बुधवारी (ता.19) येथे काही ग्रामस्‍थ येथे गटविकास अधिकाऱ्याची वाट पाहत बसले होते मात्र ते आलेच नसल्याने  येथे आलेल्या ग्रामस्‍थांनी शिवसेनेचे उपजिल्‍हा प्रमुख संदेश देशमुख यांची भेट घेतली त्‍यानंतर श्री. देशमुख यांनी पंचायत समिती कार्यालय गाठले दुपारी बारा वाजेपर्यत एकही अधिकारी नसल्याचे बघून शिवसैनिकांनी अनोखा उपक्रम राबविला. गटविकास अधिकारी यांच्या रिकाम्या खुर्चीवर डूक्‍कर बसवून आंदोलन केले. 

तसेच यावेळी येथे एकही जबाबदार अधिकारी नसल्याने संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी गटविकास अधिकाऱ्यासह, गटशिक्षणाधिकारी, कक्ष अधिकारी यांच्या रिकाम्‍्‍या खुर्चीवर देखील डूक्‍कर बसवून निषेध केला. गेल्या अनेक दिवसापासून  दिवसापासून पंचायत समितीचा कारभार ढेपाळला आहे. एकही अधिकारी कर्मचारी मुख्यालयी राहत नाही हा मनमानी कारभार थांबवून येथे कामासाठी येणाऱ्यांची कामे वेळेत व्हावीत  यासाठी आगामी काळात शिवसेना स्‍टाईल जाब विचारला जाईल अशा इशाराही देण्यात आला आहे. 

या आंदोलनात शिवसेना उपजिल्‍हा प्रमुख संदेश देशमुख, बद्री कोटकर, युवासेना तालुकाप्रमुख जगदीश गाढवे, अनिल अगस्‍ती पंचायत समिती सदस्य सुनिल मुंदडा, माणिक देशमुख, वैभव देशमुख आदींचा सहभाग होता. 

याबाबत गटविकास अधिकारी किशोर काळे यांच्याशी दुरध्वनीवरून संपर्क साधला असता हिंगोली येथे एका बैठकीला उशीर झाल्याने येथे येण्यास उशीर झाल्याचे त्‍यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The pig sits on the chairmanship of the department of development