Komal Barahate : पिंपरी येथील रणरागिणी कोमलची नॅशनल भरारी

अपघात जखमी झाल्यावर पायाने चालणेही शक्य नसताना स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा तीने संकल्प केला. अहोरात्र प्रयत्न करत मैदानावर धावली.
Komal Barahate
Komal Barahatesakal

गंगापूर - अपघात जखमी झाल्यावर पायाने चालणेही शक्य नसताना स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा तीने संकल्प केला. अहोरात्र प्रयत्न करत मैदानावर धावली. अनेक संकटे तीच्या वाट्याला दिली. असे असतानाही उमेद न हरविता तिने फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेतली आणि यशाचे शिखर गाठले.

पिंपरी (ता. गंगापूर) येथील शेत वस्तीवर राहणारी कोमल भास्कर बाराहाते असे या प्रयत्नांची पराकाष्ठा करणार्‍या तरुणीचे नाव आहे. कोमलची २०२० नंतर दुसर्‍यांदा नॅशनल हँडबॉल खेळासाठी निवड झाली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामार्फत मोहनलाल सुखदि विद्यापीठात (नॅशनल) उदयपूर येथे हँडबॉल खेळासाठी रवाना झाली आहे.

घरची परिस्थिति बेताचीच असल्याने कोमल बारहाते ही तरणी गंगापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात झेरॉक्सचे दुकान चालवून आपले शिक्षण पूर्ण करीत आहे. कोमल हिचे माध्यमिक शिक्षण वरखेड (ता. गंगापूर) येथील रवींद्र पाटील विद्यालयात झाले. खेळाची आवड तिला याच शाळेने लावली.

मुक्तानंद महाविद्यालयात धावण्याच्या स्पर्धेत जिल्ह्यापर्यंत जात होती. २०२० साली क्रीडा विभागाचे प्राध्यापक डॉ. फेरोज सैय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली ती पहिल्यांदाच नॅशनल हँडबॉल खेळण्यासाठी तीची निवड झाली. २०२२ साली शेत-वस्तीवरून गंगापूर येत असताना मोटरसायकलवर तिचा वैजापूर-गंगापूर महार्गावर मोठा अपघात झाला होता. यात तिच्या पायाला मोठी इजा झाली होती.

अपघातात गंभीर जखमी झाली. तब्बल सहा महीने ती पूर्ण खचून गेली होती. पण खेळाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने स्वतःला सावरत पुढील स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतला. अहोरात्र मेहनत घेतली. झेरॉक्स दुकान, अभ्यास असे सुरू असताना मैदानावर देखील ती पूर्ण वेळ देत होती. तिच्या प्रयत्नाला २०२४ साली 'नॅशनल' यश आले आहे.

अपघात झाला तेंव्हा पूर्णपणे खचून गेली होती. आई वडिलांनी मला पूर्ण स्वातंत्र दिले. अपघातानंतर झेरॉक्स दुकान पुन्हा चालू केले. एमकॉमचा अभ्यास आणि मैदान असे माझे ध्येय होते. डॉ. फेरोज सैय्यद यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले त्यामुळेच हे शक्य झाले. यापुढे जाण्याची आता प्रबळ इच्छा आहे.

- कोमल बाराहाते (हँडबॉल, खेळाडु)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com