esakal | राज्यातील शेतकऱ्यांच्या रोहित्रासाठी 5 हजार कोटीची तरतुद : विश्वास पाठक
sakal

बोलून बातमी शोधा

pathak

राज्यातील शेतकऱ्यांच्या रोहित्रासाठी 5 हजार कोटीची तरतुद : विश्वास पाठक

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी : गेल्या 4 वर्षात ऊर्जा विभागातर्फे राज्यात 11 हजार कोटींची कामे पुर्ण करण्यात आली आहेत. तसेच उच्चदाब वितरण प्रणाली योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर योजना राबविली जात असून त्याअंतर्गत 5 हजार कोटीची गुंतवणूक केली जात असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य विज महावितरण सूत्रधारी कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी शुक्रवारी (ता.16) दिली.

‘ऊर्जा विभागाच्या 4 वर्षातील वाटचालीचा आलेख’ या माहितीपुस्तिकेचे प्रकाशन शुक्रवारी (ता.16) सकाळी जिल्हा नियोजन सभागृहामध्ये पार पडले. राज्याची विजेची मागणी व पुरवठ्याचे गणित जुळवून भारनियमनमुक्त महाराष्ट्राचा दावा त्यांनी केला. राज्याची विजेची मागणी 18 हजार मेगावॅटवरून 25 हजार मेगावॅटपर्यंत पोहोचली आहे. 24 तास सुरळीत व स्वस्तात वीजपुरवठा करण्यात ऊर्जा विभाग यशस्वी ठरले आहे. महापारेषण, महावितरण व महानिर्मितीचे विद्युत जाळे सक्षम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. शेतीला दिवसा वीज मिळावी यासाठी उपकेंद्र सौरऊर्जा निर्मिती व स्वतंत्र वाहिनीचे काम करण्यात येत आहे, अशा विविध मुद्द्यांवर विश्वास पाठक यांनी भाष्य केले.

पाठक म्हणाले की, शेतकऱ्यांना योग्य दाबाने वीजपुरवठा करण्यासाठी उच्चदाब वितरण प्रणाली ही योजना सुरू करण्यात आली आहे. यात एका रोहित्रावर एक किंवा दोन शेतकऱ्यांना वीज जोडणी मिळणार आहे. राज्यातील जवळपास अडीच लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. येणाऱ्या काळात मुख्यमंत्री सौर कृषी पंप वाहिनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करणे शक्य होणार आहे. 2014 ते 2017 या कालावधीत वीजनिर्मिती क्षमतेमध्ये एकूण 3 हजार 280 मेगावॅट वाढ झाली आहे असे ही त्यांनी सांगितले. ता. 22 ऑक्टोबरला महावितरणच्या कार्यक्षेत्रात सर्वाधिक 21 हजार 580 मेगावॅट मागणी नोंदविण्यात आली. एकदम विजेची मागणी वाढल्यामुळे योग्य नियोजनाद्वारे 20 हजार 630 मेगावॅट वीज पुरवण्यात महावितरणला यश आले, असे श्री.पाठक यांनी सांगितले.

loading image