तरुणीवर अत्याचार प्रकरणी प्लॉटिंग व्यावसायिक अटकेत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 मे 2019

तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून नातेवाईकानेच तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणात प्लॉटिंग व्यावसायिकाला सिटी चौक पोलिसांनी शनिवारी (ता. २५) अटक केली.

औरंगाबाद - तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून नातेवाईकानेच तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणात प्लॉटिंग व्यावसायिकाला सिटी चौक पोलिसांनी शनिवारी (ता. २५) अटक केली.

आशिष गजेंद्र ब्रह्मे असे संशयिताचे नाव आहे. पीडित तरुणीने तक्रार दिल्यानुसार, नात्यातीलच तरुणीचा ब्रह्मेशी संपर्क होता. यातून त्याने तिला लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर तिचे लैंगिक शोषण केले. कुटुंबीयांना ठार मारण्याच्या धमक्‍या देत त्याने शारीरिक व मानसिक छळ केला, तसेच वारंवार लैंगिक शोषण केल्याचे तक्रारीत तरुणीने नमूद केले. सिटी चौक पोलिस ठाण्यात बलात्काराच्या आरोपाखाली संशयिताविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली. सिटी चौक पोलिसांनी आशिषला अटक केली. त्याला २९ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Plotting bussinessman arrested in torture Case