Beed Crime : जिल्हा स्तरावर आणखी एक समिती; मानसोपचार तज्ज्ञाचाही समावेश, विद्यार्थिनीवर अत्याचाराचे प्रकरण
NEET Coaching Scandal : बीडमधील नीटच्या खासगी क्लासमध्ये शिकणाऱ्या १७ वर्षीय मुलीचा संचालक व शिक्षकाने वर्षभर लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून महिला अधिकाऱ्यांची चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे.
बीड : खासगी शिकवणी वर्गात नीटची तयारी करणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्या प्रकरणात दाखल पोक्सो गुन्ह्यासंदर्भात महिला अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.