
शहरात महिंद्रा सरल हाऊसिंग फायनान्सची शाखा असून या शाखेतून ग्रामीण भागातील अनेकांना गृहकर्जाचे वाटप करण्यात आलेले आहे
चाकुर (जि.लातूर) : कर्जदाराकडून वसूल केलेले आठ लाख रूपये कर्जदाराच्या खात्यावर जमा न करता ते पैसे घेऊन लंपास झालेल्या महिंद्रा हाउसींग फायनान्सच्या वसुली अधिकाऱ्यावर चाकूर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर त्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
शहरात महिंद्रा सरल हाऊसिंग फायनान्सची शाखा असून या शाखेतून ग्रामीण भागातील अनेकांना गृहकर्जाचे वाटप करण्यात आलेले आहे. या शाखेत गणेश रामराव यादव रा. तळेगाव घाट ता. अंबाजोगाई हा वसूली अधिकारी म्हणून कार्यरत होता, त्याने २८ जूलै २०१६ ते ३० जानेवारी २०१९ या दरम्यान गृहकर्ज घेतलेल्या कर्जदाराकडून कर्जाच्या हप्त्याची रक्कम वसुल करून घेतली परंतू त्यांना रितसर पावती दिली नाही.
औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून मोठा बदल, संपर्कमंत्री म्हणून यांची निवड
तसेच ती रक्कम शाखेत किंवा कर्जदाराच्या खात्यावर जमा केली नाही. असा प्रकार अनेक महिने चालल्यानंतर कर्जदारांनी शाखेत येऊन संपर्क साधला. वसूली अधिकाऱ्यांने आमच्याकडून पैसे घेतले परंतू आम्हाला पावती दिली नसल्याचे सांगितले. याबाबत विधी अधिकारी नवनाथ ढोणे यांच्या फिर्यादीवरून आठ लाख २१ हजार ३०० रूपयाची कर्जदार व बँकेचे फसवणुक केली म्हणून गणेश यादव याच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यास अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक सुभाष सुर्यवंशी यांनी दिली.
(edited by- pramod sarawale)