esakal | नांदेड : पोलिस ठाण्यात पीएसआयला प्रेयसीने यथेच्छ झोडपले
sakal

बोलून बातमी शोधा

Police beaten at Uamari dist Nanded

उमरी पोलीस ठाण्यातील एक फौजदार आधी पुण्यातील कोथरूड भागात नोकरीला होता. तिथे एका महिला पोलिस कॉन्स्टेबलसोबत त्याचे सूत जुळले. तब्बल सात वर्षे त्याचे तिच्याशी प्रेमप्रकरण चालले.

नांदेड : पोलिस ठाण्यात पीएसआयला प्रेयसीने यथेच्छ झोडपले

sakal_logo
By
प्रल्हाद हिवराळे

उमरी (जि. नांदेड) - उमरीचे पोलिस ठाणे नेहमी वादग्रस्त घटनांनी चर्चेत असते. कधी पोलिसांचे निलंबन प्रकरण असते तर कधी लाच घेण्याचे प्रकरण..आज मात्र एका वेगळ्याच घटनेने हे पोलिस ठाणे चर्चेत आले. या पोलिस ठाण्यातील एका फौजदारालाच भर दुपारीच त्याच्या प्रेयसीकडून फटक्यांचा मार सहन करावा लागला. या झोडपाझोडपीच्या प्रकरणाची खमंग अशी चर्चा परिसरात रंगली आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, उमरी पोलीस ठाण्यातील एक फौजदार आधी पुण्यातील कोथरूड भागात नोकरीला होता. तिथे एका महिला पोलिस कॉन्स्टेबलसोबत त्याचे सूत जुळले. तब्बल सात वर्षे त्याचे तिच्याशी प्रेमप्रकरण चालले. त्याने तिच्याशी विवाहाच्या आणाभाका घेतल्या तसेच त्याने तिला ‘तू कॉन्स्टेबल आहेस. आपल्या प्रतिष्ठेला ते चांगले दिसणार नाही. तू नोकरीचा राजीनामा दे‘, असेही बजावले. त्याच्या सांगण्यावरून तिने राजीनामाही दिला. मात्र नंतर त्याची दुसरीकडेच लग्नाची सोयरिक जुळली.

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका   

ही बाब संबधित प्रेयसीला कळाल्यावर तिने त्याला जाब विचारण्यासाठी आज उमरीचे पोलिस ठाणे गाठले. दिमतीला प्रहार संघटनेचे नांदेड व लातूरचे जिल्हाध्यक्ष व उमरी तालुक्यातील प्रहारचे कार्यकर्ते सोबत घेतले. आज दुपारी दोनच्या सुमारास पोलिस ठाण्यात येताच तिने सहायक पोलिस निरीक्षकांना ‘कुठे आहे तो फौजदार', अशी विचारणा केली. त्यानंतर तो फौजदार स्वतःच ठाण्यात हजर झाल्यानर तिने त्याला झोडपायला सुरूवात केली. हातातील पाण्याच्या बाटलीचाही प्रसाद त्याला दिला.

कोरोना बाधित रुग्णांना काजू अन् अक्रोडचा खुराक    

‘आपल्या का फसविले‘, याचा जाब विचारू लागली. ठाण्यात सुरू असलेल्या या प्रकाराने सर्व पोलिस कर्मचारीही आवाक झाले. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षकांनी या घटनेची माहिती धर्माबाद उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांना दिली. या प्रेयसीने याबाबतची तक्रार उमरी पोलिसात सहायक पोलीस निरीक्षक यांच्याकडे दिली. तसेच ती या फौजदारांना घेऊन धर्माबादकडे वरिष्ठांकडे जाणार असल्याचेही समजते. या संदर्भात धर्माबादचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील यांना ‘सकाळ' प्रतिनिधीने विचारले असता त्यांनी याप्रकारची कसलीही घटना माझ्याकडे आली नसल्याचे सांगितले व हे प्रकरण झिडकारून टाकले.