जुगारावर छापा; अडीच लाखांचा मुदेमाल जप्त

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 10 May 2020

उक्कलगाव (ता. मानवत,जि.परभणी) शिवारात एका आखाड्यावर झन्ना- मन्ना नावाचा जुगार खेळणाऱ्या दहाजणांवर स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी (ता. नऊ) सायंकाळी सहाच्या सुमारास कारवाई केली.

मानवत (जि.परभणी) : उक्कलगाव (ता. मानवत) शिवारात एका आखाड्यावर झन्ना- मन्ना नावाचा जुगार खेळणाऱ्या दहाजणांवर स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी (ता. नऊ) सायंकाळी सहाच्या सुमारास कारवाई केली. या कारवाईत तब्बल अडीच लाखांच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला.

उक्कलगाव शिवारातील एका आखाड्यावर काही व्यक्ती झन्ना - मन्ना नावाचा जुगार खेळत असल्याची खबर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास दिंगाबर पिंपळे यांच्या आखाड्यावर कारवाई केली असता काही व्यक्ती गोलाकार बसून जुगार खेळताना आढळून आले. 

हेही वाचा व पहा : Video : परभणीला वादळी वाऱ्यासह गारपिटीचा तडाखा

दहा जणाविरोधात गुन्हा दाखल
या आरोपींकडून ५१ हजार ५०० किंमतीचे एकूण नऊ मोबाइल, नगदी ६५ हजार २४० रुपये व एक लाख ३५ हजार किमतीच्या चार मोटारसायकली, असा एकूण दोन लाख ५१ हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अविनाश दहे, उमेश कारले, सुधाकर बारहाते, हरिभाऊ उगलकर, महादेव पिंपळे, दत्ता घाडगे, अमृत पिंपळे, परमेश्वर थोरे, दादाराव मुजमुले, दिंगाबर पिंपळे या दहा जणा विरोधात जुगार कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक जमीर फारुखी यांच्या फिर्यादीवरून शनिवारी रात्री मानवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक फौजदार रमेश ताठे हे करीत आहेत.

हेही वाचा : रस्त्यात फसला लोडिंग ट्रक अन् वाहतुकीचा झाला खोळंबा

कारवाईत यांचा समावेश
या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक व्यकटेश आलेवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनेश मुळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक शरद विपट, कर्मचारी सुग्रीव केंद्रे, मधुकर चट्टे, बालासाहेब तुपसुंदर, हानमंत जक्कावाड, निलेश भुजबळ, जमीर फारोखी, भगवान भुसारे, शंकर गायकवाड, हरिश्चंद्र खुपसे, आरूण कांबळे आदी सहभागी झाले. 

हेही वाचा...
कडब्याची गंजी जळून खाक
पूर्णा (जि.परभणी) :
निळा (ता.पूर्णा) येथील गावातील रुग्णालयाजवळ असलेल्या दादाराव माणिकराव सूर्यवंशी व बंडू माणिकराव सूर्यवंशी यांच्या गोठ्यास रविवारी (ता. दहा) दुपारी दोन वाजता आग लागली. त्या शेजारी असलेल्या कडब्याच्या गंजीनेही पेट घेतला. पूर्णा नगर परिषदेच्या अग्निशमन दलाचे गणेश रापतवार , दीपक गवळी, सोनाजी खिल्लारे, अमजद कुरेशी, साईनाथ दुधे यांनी आग विझवून त्यावर नियंत्रण मिळविले. काही वर्षांपूर्वी याच परिसरात आग लागली होती. त्या वेळी आग पसरत गेल्याने अनेक घरे जळून खाक झाली होती. यावेळी वेळेवर अग्निशमन दलास पाचारण केल्याने मोठे नुकसान टळले आहे. सरपंच नंदाबाई बुद्धे व उपसरपंच गोविंद सूर्यवंशी यांनी अग्निशमन दलाचे कौतुक करून आभार मानले. या आगीत नेमके किती नुकसान झाले त्या बाबत नेमकी माहिती मिळाली नसून महसूल विभागाचे पथक पंचनामा करण्यासाठी दाखल झाले होते.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police crackdown on gamblers Parbhani News