महिलेवर बलात्कार नराधमांना पोलिस कोठडी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 डिसेंबर 2019

0- हैदराबादचे प्रकरण ताजे असतांना नांदेडात बलात्कार

०- लिंबगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

०- नऊ डिंसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत 

नांदेड : विवाहितेवर अत्याचार करणाऱ्या दोघांना प्रथमवर्ग न्यायाधिश (पाचवे ) एन. एल. गायकवाड यांनी त्यांना नऊ डिसेंबरपर्यंत शुक्रवारी (ता. सहा) डिसेंबर रोजी पोलिस कोठडीत पाठविले आहे. ही घटना गुरूवारी (ता. पाच) पहाटे एकच्या सुमारास लिंबगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पासदगाव शिवारात घडली होती. 

 

हैद्राबाद व उन्नाव (युपी) येथील अत्याचार व खून या घटनांनी संबंध देश ढवळून निघत असतांना नांदेड जिल्ह्यातही अत्याचाराची किळसवाणी घटना पुढे आली आहे. त्याचे असे झाले की, लिंबगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पासदगाव येथील एका शेतावर सालगडी म्हणून एक कुटुंब कामाला होते. ते आपल्या परिवारासह शेतातील आखाड्यावर राहतात. सालगड्याची पत्नी शेताच्या बाजूला असलेल्या का धाब्यावर स्वयंपाकाचे काम करते. बुधवारी तीने आपले धाब्यावरील काम आटोपुन आखाड्यावर गेली. आपल्या कुटुंबासह ती झोपली. 

 

पिडीत महिलेसोबत काम करणारे आरोपी 

 

गुरूवारी (ता. पाच) पहाटे एकच्या सुमारास ती ज्या धाब्यावर काम करीत होती तेथील वेटर अरविंद रामा जाधव (वय ४५) आणि त्याचा सहकारी लखन गणेश मोरे (वय २९) हे दोघे त्या आखाड्यावर गेले. झोपेत असलेल्या या महिलेला त्यांनी संगनमत करून उचलुन बाजूच्या खोलीत नेले. तिला धमकावत तिचे तोंड दाबून दोन वेळेस अत्याचार केला. तिच्या ओरडण्यामुळे पतीला जाग आली. यावेळी पतीला जाग येताच या नराधम दोघांनी तिला धमकावत तेथून पसार झाले. घडलेल्या प्रकारानंतर पतीने तिला सोबत घेऊन सकाळी लिंबगाव पोलिस ठाणे गाठले. घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. त्यानंतर पिडीत महिलेच्या फिर्यादीवरुन अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

 

नराधमांना पोलिस कोठडी

 

या प्रकरणाचा सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्‍वांभर पल्लेवाड यांनी तपास फौजदार गणेश गोटके यांच्याकडे देताच त्यांनी गुप्त माहितीवरून अरविंद जाधव व लखन मोरे या दोघांना अटक केली. त्यांची कसुन चौकशी केली असता त्यांनी केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. फौजदार गोटके यांनी या दोघांना नांदेडच्या प्रथमवर्ग न्यायाधिश (पाचवे) एन. एल. गायकवाड यांनी सोमवार (ता. नऊ) डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत पाठविले आहे. या घटनेने पुन्हा एकदा महिलांवरील अत्याचाराने जिल्हा हादरुन गेला आहे. या किळसवाणी घटनेचा तपास गणेश गोटके करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police detain woman for rape