‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केले रक्तदान

सुरेश घाळे
मंगळवार, 7 एप्रिल 2020


या आवाहनाला प्रतिसाद देत शिवा संघटना धर्माबाद तालुका व पोलिस स्टेशन धर्माबाद यांच्या संयुक्त पुढाकाराने शनिवारी सकाळी साडेसात वाजता पोलिस स्टेशन येथे रक्तदान शिबिरास सुरवात झाली. या रक्तदान शिबिराचे उद्‍घाटन तहसीलदार दत्तात्रय शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

धर्माबाद, (जि.नांदेड) ः कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याचे लक्षात येताच धर्माबाद येथील शिवा संघटना व पोलिस ठाण्याच्या संयुक्त पुढाकाराने शनिवारी (ता. चार) सकाळी साडे सात वाजता पोलिस स्टेशन धर्माबाद येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले असून या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या रक्तदान शिबिरात पोलिस उपविभागीय अधिकारी सुनील पाटील, तहसीलदार दत्तात्रय शिंदे, पोलिस निरीक्षक सोहन माछरे, मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्यासह तब्बल १८० दात्यांनी रक्तदान केले आहे.

 

हेही वाचा -  सर्व विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेशित करा

 

या आवाहनाला प्रतिसाद देत शिवा संघटना धर्माबाद तालुका व पोलिस स्टेशन धर्माबाद यांच्या संयुक्त पुढाकाराने शनिवारी सकाळी साडेसात वाजता पोलिस स्टेशन येथे रक्तदान शिबिरास सुरवात झाली. या रक्तदान शिबिराचे उद्‍घाटन तहसीलदार दत्तात्रय शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. या वेळी उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील, पोलिस निरीक्षक सोहन माछरे, मुख्याधिकारी मंगेश देवरे, पोलिस उपनिरीक्षक नागनाथ सनगल्ले, शिवा कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वीरभद्र बसापुरे, शिवा संघटनेचे तालुकाध्यक्ष आबासाहेब पाटील बन्नाळीकर, अनिल मुंडकर, संतोष विभुते, प्रकाश जायसेठ, राम रोन्टे, सनद माळगे, मन्मथ स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती.

१८० रक्तदात्यांनी रक्तदान केले
सदरील रक्तदान शिबिरात १८० रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. या वेळी नांदेड येथील गोळवलकर गुरुजी रक्तपेढीने रक्त संक्रमित केले आहे. या वेळी डॉ. तोंडेवाड, उदय राऊत, प्राजक्ता वन्ने, व्यंकटेश पालकृतवार, बालाजी शिंदे, राम महाजन, कैलास भालके आदी उपस्थित होते. शिबीर यशस्वितेसाठी पोलिस निरीक्षक सोहन माछरे, पोलिस उपनिरीक्षक नागनाथ सनगल्ले, शिवा संघटनेचे तालुकाध्यक्ष डॉ. आबासाहेब पाटील बन्नाळीकर, शिवा कर्मचारी महासंघाचे जिल्हा प्रमुख, वीरभद्र बसापुरे, राहुल पाटील बाळापूरकर, लल्लेश मंगनाळीकर, सागर चिद्रावार, ना. सा. येवतीकर, आनंद येडपलवार, रमेश कुंभारे, सतीश पाटील हारेगावकर, कृषी फर्टिलायझर असोसिएशनचे अध्यक्ष रत्नाकर पाटील कदम, सय्यद अल्ताफ भाई, शिवसेनेचे संघटक गणेश गिरी, शिवसेनेचे शहर प्रमुख अनिल कमलाकर, राम रोंटे, आनंद राठी, कपिल सारडा, समीर अहमद, पोलिस कर्मचारी संतोष आनेराय, साईनाथ स्वामी रोशनगावकर, ॲड. राहुल सोनटक्के यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police donated blood on the back of 'Corona', nanded news