esakal | Breaking News: जालन्यात पोलिसांकडून आरोपींवर सिनेस्टाईल फायरींग
sakal

बोलून बातमी शोधा

jalna

Breaking News: जालन्यात पोलिसांकडून आरोपींवर सिनेस्टाईल फायरींग

sakal_logo
By
दीपक सोळंके

भोकरदन (जालना): एटीएम फोडणाऱ्या टोळीचा पाठलाग सुरू असताना आरोपी चारचाकी वाहनातून पळ काढत असल्याचे लक्षात येताच परभणी स्थानिक गुन्हे शाखेकडून आरोपींवर गोळ्या झाडल्या गेल्या आहेत. पोलिस पथकातील एका अधिकाऱ्याने आरोपी घेऊन पळत असलेल्या वाहनाच्या चाकावर फायरींग केली आहे. मात्र, नेम हुकल्याने आरोपी वाहन घेऊन पसार झाला आहे. तर टोळीतील इतर काही आरोपी शहरात असल्याचा संशय पोलिसांना असून त्यांचा शोध पोलिस घेत आहेत. ही घटना बुधवारी (ता.16) दुपारी एक वाजेच्या सुमारास भोकरदन शहरात घडली.

ज्या कारवर फायरींग झाले त्या कारची सीसीटीव्ही फुटेज

ज्या कारवर फायरींग झाले त्या कारची सीसीटीव्ही फुटेज

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, परभणी येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एटीम फोडणाऱ्या परराज्यातील टोळीचा बुधवारी औरंगाबाद येथून पाठलाग करत होते. पाठलागादरम्यान ही टोळी भोकरदन शहरातील जाफराबाद मुख्य रस्त्यावरील केळना नदीच्या पुलाजवळ थांबल्याची माहिती या पथकाला मिळाली. यावेळी टोळीतील आरोपींपैकी काही जण शहरात काहीतरी खरेदीसाठी उतरले. तर चार चाकी वाहनात असललेल्या संशयित आरोपीला पोलिस मागावर असल्याचे समजताच त्याने वाहनातील आरोपींनी वाहन भरधाव वेगाने पळविण्यास सुरवात केली.

हेही वाचा: अनलॉकनंतर लाल परी जोरात; अवघ्या आठ दिवसांत लाखोंचे उत्पन्न

पोलिस पथकानेही पाठलाग सुरू केला. यादरम्यान पोलिस पथकातील एकाने आरोपींच्या वाहनाच्या टायरच्या दिशेने गोळी झाडली. मात्र, नेम हुकला व पुलावर वाहनांच्या गर्दीचा फायदा घेत आरोपीने वाहयासह पळ काढला. दरम्यान या प्रकरणानंतर वाहनातून उतरलेले टोळीतील इतर आरोपी गर्दीत पसार झाल्याचे समजते. पोलीसांनी शहरातील व परिसरातील विविध भागात शोध मोहीम सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे. अचानक घडलेल्या या फिल्मी स्टाईल प्रकाराने शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान पथकातील पोलिसांशी याप्रकरणी माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बोलणे टाळले.

रस्त्यावरून जाताना कार

रस्त्यावरून जाताना कार

या प्रकरणाची आम्हालाही पूर्वकल्पना नव्हती. मात्र, शहरात गोळीबार झाल्याचे समाजल्यांनतर आम्ही घटनास्थळी धाव घेतली. या कारवाई संदर्भात पथकातील अधिकाऱ्यांशी समन्वय साधला जात आहे.

शालिनी नाईक, पोलिस निरीक्षक, भोकरदन

loading image