महानगरातून प्रवास करून विनापरवाना गावात प्रवेश, सहा जणांविरोधात गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 2 May 2020

जिल्हाबंदी असताना पुणे, हैदराबाद व परराज्यातील शेंदवा या महानगरातून येऊन गावात पाच जणांनी कुठलीही कल्पना न देता कायद्याचे उल्लंघन करत गावात प्रवेश केला आहे.

केज (जि. बीड) -  राज्यातील व परराज्यातील महानगरातून प्रवास करून गाव सुरक्षा समितीची परवानगी न घेता गावात प्रवेश करणाऱ्या सहा जणा विरोधात युसुफवडगाव पोलीस ठाण्यात शुक्रवारी (ता. ३०) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे बाहेरील जिल्ह्यातून येणाऱ्यांनी गावात प्रवेश करण्यापूर्वी ग्राम सुरक्षा समितीची परवानगी घेऊन स्वत:ची वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक आहे.

कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे सर्वांनी पालन करणे कायद्यान्वये बंधनकारक आहे. त्यामुळे सर्वत्र लॉकडाउनचे काटेकोर पालन केले जात आहे. सध्या जिल्हाबंदी असताना पुणे, हैदराबाद व परराज्यातील शेंदवा या महानगरातून येऊन गावात पाच जणांनी कुठलीही कल्पना न देता कायद्याचे उल्लंघन करत गावात प्रवेश केला आहे.

हेही वाचा - युरोपातील सर्व देशांनी आता संयुक्त कृती करावी - डॉ. जॉन कार्लोस

संबंधित गावच्या ग्रामसेवकांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून युसूफवडगाव ठाण्यात वैभव चोपणे (रा.युसूफवडगाव), अण्णा गायकवाड (रा. जवळबन), रमेश आखाडे, राजेश खोड, भांगला शुक्लाल मोरे, राजू मोरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक पिंपळे व पवार हे करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police have registered a case against six persons