esakal | पोलिसांनी असे काही केले, की गावाकडे निघालेले मजूर कुटुंबाला माघारीच गेले
sakal

बोलून बातमी शोधा

Osmanabad News

विचारपूस केली असता, ''आम्ही बीड जिल्ह्यातील धारूर येथे राहत असून, सध्या संचारबंदीमुळे उपासमार होत आहे. त्यामुळे आम्ही काम शोधण्यासाठी बार्शी येथे जात आहोत,'' असे उत्तर मिळाले. धारूरहून सकाळी दहा वाजता पायी निघालेले हे कुुटुंब ३८ किलोमीटर पायी चालत आले होते. आणखीन ५५ किमी पायी चालून ते बार्शी येथे जाणार होते.

पोलिसांनी असे काही केले, की गावाकडे निघालेले मजूर कुटुंबाला माघारीच गेले

sakal_logo
By
मंगेश यादव

कळंब (उस्मानाबाद) : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारांनी जिल्हाबंदीचे आदेश काढले आहेत. जिल्हाधिकाऱयांच्या आदेशाने उस्मानाबाद जिल्हाही बंद करण्यात आल्यामुळे कळंब-केज रोडवरील जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या मांजरा पुलाजवळ पोलिसांनी नाकेबंदी केली आहे. 

या नाकेबंदी पॉईंटवर कळंब पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक चैनसिंग गुसिंगे, पोलीस कर्मचारी साधू शेवाळे गुरुवारी (ता. २) नाकेबंदी करत होते. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास श्री. गुसिंगे यांना केजकडून कळंबकडे एक परिवार आपल्या तीन मुलाबाळांसह सायकलवर घरगुती साहित्य बांधून पायी जात असल्याचे दिसले. 

त्यांना विचारपूस केली असता, ''आम्ही बीड जिल्ह्यातील धारूर येथे राहत असून, सध्या संचारबंदीमुळे उपासमार होत आहे. त्यामुळे आम्ही काम शोधण्यासाठी बार्शी येथे जात आहोत,'' असे उत्तर मिळाले. धारूरहून सकाळी दहा वाजता पायी निघालेले हे कुुटुंब ३८ किलोमीटर पायी चालत आले होते. आणखीन ५५ किमी पायी चालून ते बार्शी येथे जाणार होते.

पोलिसांचे मन द्रवले

ही व्यथाऐकल्यावर पोलीस उपनिरीक्षक चैनसिंग गुसिंगे आणि त्यांच्या सोबतच्या कर्मचाऱयांनी या परिवाराला सध्या देशात चाललेल्या परिस्थितीची जाणीव करून देत शासनाने प्रत्येकाला आहे तिथेच थांबायचे सांगितलेले आहे, असे सांगितले. त्या कुटुंबाला एक महिना पुरेल इतके अन्नधान्य आणि घरगुती साहित्य भरून देण्याची स्वतः जबाबदारी घेऊन त्यांना परत धारूर येथे एक खाजगी वाहनात पाठवले. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

अशा या कोरोना विषाणू प्रतिबंधाच्या परिस्थितीत पोलीस प्रशासनावर प्रचंड तणाव पडलेला आहे. त्यावर मात करीत पोलीस उपनिरीक्षक चैनसिंग गुसिंगे यांनी खाकी वर्दीतील माणूसकी दाखविल्यावर त्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता.

loading image