avinash antreddi and hanumant bangar
sakal
औराद शहाजानी (जि. लातूर) - वेळ रात्रीच्या अकराची. तो मित्राला भेटून घराकडे निघालेला. अंधारात बसस्थानकाजवळील एका झाडाजवळ त्याला काहीशी हालचाल दिसली. भूत वगैरे म्हणत तो काही घाबरला नाही. त्याने थोडे जवळ जाऊन पाहिले तेव्हा एक माणूस चक्क दोरीच्या साहाय्याने फाशी घेण्याच्या प्रयत्नात असल्याचे त्याला दिसले.