esakal | पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोना, चौदा दिवसांपासून ठाण्यात दोनच गुन्ह्यांची नोंद
sakal

बोलून बातमी शोधा

Jalkot Police Station

जळकोट येथील पोलिस ठाण्यातील नऊ पोलिस कर्मचाऱ्यांना मागील चौदा दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. नेहमी वर्दळ असलेल्या पोलिस ठाण्याला चौदा दिवसांपासून शुकशुकाट दिसून येत असून वरील दिवसात फक्त दोनच गुन्ह्याची नोंद झाली आहे.

पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोना, चौदा दिवसांपासून ठाण्यात दोनच गुन्ह्यांची नोंद

sakal_logo
By
शिवशंकर काळे

जळकोट (जि.लातूर) : येथील पोलिस ठाण्यातील नऊ पोलिस कर्मचाऱ्यांना मागील चौदा दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. नेहमी वर्दळ असलेल्या पोलिस ठाण्याला चौदा दिवसांपासून शुकशुकाट दिसून येत असून वरील दिवसात फक्त दोनच गुन्ह्याची नोंद झाली आहे. तालुक्यातील ४५ गावांतील नागरिकांची काळजी घेण्यासाठी जळकोट येथे पोलिस ठाणे आहे.

दररोज शेती, घरगुती, चोरी, महिलाच्या तक्रारी आदींसह अनेक कामासाठी पन्नासहून अधिक नागरिक आपल्या तक्रारी घेऊन येतात. त्यात काही जणांची समजूत काढून पाठवून देतात, तर काहीच्या फिर्याद घेऊन गुन्हे दाखल करतात. त्यामुळे तालुक्यातील दररोज तीन-चार गुन्ह्याची नोंद येथे होते. पंरतू मागील चौदा दिवसांपूर्वी पोलिस ठाण्यातील नऊ पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे अन्य कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला होता.

ओव्हरफ्लोमुळे मत्स्यबीज जातेय वाहून, मत्स्य व्यावसायिक चिंतातूर !

दर महिन्याला अंदाजे विस ते पंचवीस विविध गुन्ह्याची नोंद होत होती. त्यामुळे कर्मचारी आदीच अपुरे असल्याने कामाचा ताण वाढत होता. तालुक्यातील ८२ हजार नागरिकांची सुरक्षा करण्याठी २८ अधिकारी, पोलिस कर्मचारी असल्याने कामाचा ताण पडत असतो. तरीही येथील पोलिस कर्मचारी तालुक्यातील शांतता ठेवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करतात. चौदा दिवसांची जशी परिस्थिती होती, तशीच परिस्थिती पुढील दिवसांत राहिल्यास कामाचा ताण कमी होईन खऱ्या फिर्यादीला न्याय देण्यास मदत होईल.


तालुक्यातील नागरिकांनी आपापल्या गावात शांतता राखणे ही सर्वाची जबाबदारी आहे. गेल्या चौदा दिवसांपासून पोलिस ठाण्यात जी नागरिकांविना शांतता दिसत होती, अशी शांतता इतर दिवसांतून दिसून येत गेली तर पोलिसांवरील कामाचा ताण कमी होईल आणि गावेही गुण्यागोविंदाने नांदतील.
- गणेश सोंडारे, पोलिस निरीक्षक, जळकोट

 

संपादन - गणेश पिटेकर