esakal | पैठणनगरीतून संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान
sakal

बोलून बातमी शोधा

पैठण (जि.औरंगाबाद) : संत एकनाथ महाराज पालखी पंढरपूर वारी प्रस्थान प्रसंगी रघुनाथ महाराज गोसावी, रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे, रेखाताई कुलकर्णी, नंदलाल काळे यांच्यासह वारकरी व भाविक. पालखीतील पादुका घेऊन जाताना मान्यवर. (छायाचित्र : अशिष तांबटकर)

पैठणनगरीतून संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

sakal_logo
By
चंद्रकांत तारु

पैठण (जि.औरंगाबाद) : येथील (Paithan) संत श्री एकनाथ महाराज (Sant Eknath Maharaj) यांच्या पादुका पालखी सोहळ्याचे आषाढी एकादशी यात्रेसाठी (Aashadi Ekadashi) सोमवारी (ता.१९) पंढरपूरकडे प्रस्थान झाले. यंदा ही दुसऱ्या वर्षी कोरोनामुळे पायी दिंडी सोहळा नसल्यामुळे नाथांच्या पालखीतील (Sant Nath Palkhi) पादुका एसटी बसद्वारे पंढरपूरला नेण्यात आल्या. यासाठी दोन एसटी बस करण्यात आल्या असुन एका बसमध्ये प्रत्येकी २० असे एकुण ४० वारकरी (Aurangabad) या पालखी सोहळ्यात गेले आहे. दरम्यान, एसटीला आकर्षक फुलांची सजावट वारकरी भाविकांनी केली होती. सोमवारी सकाळी आठ वाजता पालखी प्रस्थान सोहळ्याची तयारी करण्यात आली. गोदाकाठी नाथ मंदिरात व पालखी स्थळी फुलांची आरास करण्यात आली. (eknath maharaj palkhi leave for pandharpur ashadhi in paithan tahsil of aurangabad district glp88)

हेही वाचा: स्वातंत्र्यानंतरही मरण यातना संपेना! अहो माणुसकी गेली कुठे?

यामुळे चैतन्याचे वातावरण निर्माण होऊन भक्तीचा सुंगध दरवळा. नाथांचे वंशज तथा पालखी सोहळाप्रमुख रघुनाथ महाराज गोसावी यांनी पालखीतील नाथांच्या पादुकांचे विधिवत पुजन केले. यावेळी वारकऱ्यांनी भजनाचा सुर टाळ-मृदंगाच्या गजरात आवळीत नाथांचा जयजयकार केला. यावेळी मोजक्याच वारकरी व भाविकांची उपस्थिती होती. रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी नाथांच्या पादुकांचे दर्शन घेतले. यावेळी जिल्हा सहकारी दुध संघाचे उपाध्यक्ष नंदलाल काळे, संत एकनाथ साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अंकुश रंधे, विलास मोरे महाराज आदी उपस्थित होते.

हेही वाचा: दोघांचे प्रेम पाहून पोलिस भारावले! चार किलोमीटर पळवल्यानंतर...

पुढच्या वर्षी तरी पायी वारी घडु दे : मंत्री संदीपान भुमरे

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षांपासून पायी वारीची शेकडो वर्षांची परंपरा खंडित झाली आहे. तसेच पालखी दिंडी सोहळा प्रस्थानासाठी वारकऱ्यांच्या उपस्थितीने गजबजलेले भक्तीमय आनंदी वातावरण हरवले आहे. यामुळे आता पुढील वर्षी तरी नाथांची वारी पायी घडु दे, अशी प्रार्थना विठ्ठू माऊलीच्या चरणी मंत्री संदीपान भुमरे ( Employment Guarantee And Horticulture Minister Sandipan Bhumare) यांनी केली. आजच्या पालखीचे दर्शन घेऊन मनस्वी आनंद होत असल्याचे ते म्हणाले.

पायी वारीचे वारकरी, भाविकांना दुःख !

पंढरीची वारी, मग ती आषाढीची असो वा कार्तिकीची, या दोन वाऱ्या म्हणजे वारकऱ्यांचा मोक्षमार्ग. संत एकनाथ महाराजांचा जयघोष करीत कोणीही वारकरी, भाविक या वारीच्या आनंदयात्रेत सहभागी होतात. साक्षात संतांच्या रूपाने अजरामर झालेल्या संतांच्या सान्निध्यात तब्बल १८ दिवस चालण्याचे भाग्य या वारीच्या काळात लाभते. वारीमुळे नवचैतन्याची अनुभूती येते. तसेच यातून मिळणाऱ्या ऊर्जेमुळे आरोग्यदायी व चैतन्य निर्माण होते. परंतु हा आनंद आता मिळत नसल्यामुळे पायी वारीचे दुःख पालखी प्रस्थान प्रसंगी वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसून आले.

loading image