

Kaigaon Gambling Racket Exposed in Police Raid at Local Eatery
esakal
-राजेंद्र व्यास
गंगापूर : छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर महामार्गावरील नवीन कायगाव बसस्थानकाजवळील जय भवानी नाष्टा सेंटरमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर ग्रामीण गुन्हे अन्वेषण शाखेने सोमवारी दुपारी ४ वाजता धडक कारवाई केली. या छाप्यात पोलिसांनी १४ लाख ३३ हजार १७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.