उदगीर, (जि. लातुर) - गेल्या अनेक दिवसापासून रानमाळ हॉटेल मोघा (ता. उदगीर) येथे कायदा धाब्यावर बसवुन मोठ्या प्रमाणावर जुगाराचा आंतरराज्यीय अड्डा सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांना मिळाली.
त्यावरुन त्यांनी दिलेल्या आदेशावरून रविवारी (ता. १३) रात्री अकराच्या सुमारास उदगीर ग्रामीण, शहर व देवणी पोलिसांच्या संयुक्त छाप्यात ३७ जणांवर गुन्हे दाखल करून पाच लाखाचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.