कंत्राटदाराच्या नावे परस्पर उचललं कर्ज, रत्नाकर गुट्टे यांना पोलिस कोठडी

प्रशांत बर्दापूरकर
Thursday, 12 March 2020

ऊसतोड कंत्राटदारांच्या नावावर बँकेतून परस्पर संगणमताने कर्ज उचलल्याच्या आरोपात आमदार रत्नाकर गुट्टे यांना गुरुवारी (ता.१२) येथील दुसरे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ओ.ए. साने यांनी शनिवार (ता.१५) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणी येथील ग्रामीण पोलिस ठाण्यात मागील महिन्यातच  न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल झाला होता.

अंबाजोगाई : ऊसतोड कंत्राटदारांच्या नावावर बँकेतून परस्पर संगणमताने कर्ज उचलल्याच्या आरोपात आमदार रत्नाकर गुट्टे यांना गुरुवारी (ता.१२) येथील दुसरे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ओ.ए. साने यांनी शनिवार (ता.१५) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणी येथील ग्रामीण पोलिस ठाण्यात मागील महिन्यातच  न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल झाला होता.

डोंगरपिंपळा (ता.अंबाजोगाई) येथील रावण पांडूरंग केंद्रे, प्रभाकर गुलाब केंद्रे व अनंत सुदाम पवार हे ऊसतोड कंत्राटदार (मुकादम) आहेत. त्यांनी २०१५ मध्ये गंगाखेड शुगर अॅंन्ड एनर्जी लिमिटेड या कारखान्याकडे मजूर पुरवण्याचा करार केला होता. हा करार करतेवेळी त्यांनी कारखान्याच्या मागणीप्रमाणे बँक ऑफ इंडिया अंबाजोगाई शाखेचे तीन कोरे चेक, बाॅंन्ड, ट्रॅक्टर ट्राॅलिचे आरसी बुक, आधार कार्ड, इन्शुरन्स प्रत, शेतीचा सातबारा, आठ 'अ', फोटो व कोरे फाॅम अशी कागदपत्रे दिली होती.

बाजेवर टाकून आणले मायलेकीचे मृतदेह  

आरोपींनी या कागदपत्राचा गैरवापर करून संगणमताने फिर्यादिच्या नावे परस्पर प्रत्येकी तीघांच्या नावावर १२ लाख कर्ज मंजूर (एकुण ३८ लाख ४० हजार) केले. ते बनावट बँक खात्यात टाकून परस्पर उचलले. या आरोपावरून रत्नाकर गुट्टे यांच्यासह कारखान्याचे कार्यकारी संचालकावर गुन्हा दाखल झाला होता.

येथील ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी आमदार गुट्टे यांना दुसरे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले. असता, त्यात न्यायदंडाधिकारी यांनी आमदार गुट्टे यांना शनिवार (ता.१५) पर्यंत पोलिस काठडी सुनावली. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे अॅड. श्रीमती एल. यु. कुलकर्णी यांनी बाजू मांडली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Remand Custody To Ratnakar Gutte Ambajogai Beed News