Jalna News: जालन्यात मंगळबाजारातून गुटख्याचा दोन लाखांहून अधिक साठा आणि आलिशान दुचाकी जप्त; दोघांना अटक
Gutkha Raid: जालना पोलिसांनी मंगळबाजार येथील कारवाईत ₹३.५९ लाखांचा गुटखा आणि आलिशान दुचाकी जप्त केली. दोघांना अटक करून पोलिस कोठडीत पाठवले असून गुटखा माफियाचे रॅकेट उघड होण्याची शक्यता.
जालना : शहरातील मंगळबाजार येथून सदर बाजार पोलिसांनी दोन लाख ९ हजारांच्या गुटख्यासह एक दुचाकी असा एकूण तीन लाख ५९ हजार १४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.